🕒 1 min read
मुंबई : शिवसेनेत बंड पुकारल्यापासून ते आत्तापर्यंत एकनाथ शिंदे हे चांगले चर्चेत राहिले आहेत. आता तर ते मुख्यमंत्री असल्यामुळे त्यांच्या निर्णय घेण्याच्या शैलीमुळे आणखी चर्चेत आले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आता सध्या राज्याचा कारभार सुरू आहे. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या पत्नी लता शिंदे यांना वाढदिवसाच्या अनोख्या शुभेच्छा दिल्या आहेत.
“जीवनातील बिकट व प्रतिकूल परिस्थितीत माझ्या पाठीशी तु खंबीरपणे उभी राहिलीस,सामाजिक, राजकीय जीवनात मी समर्पित होऊन कार्यरत असताना आपल्या संसाराचा गाडा जबाबदारीने व अतिशय मायेने हाकलास. तुझ्यासारखी सुजाण, सुज्ञ, मनमिळाऊ पत्नी लाभणे हे माझे बलवत्तर नशीब समजतो. लता, वाढदिवसाच्या शुभेच्छा.” अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी पत्नी लता शिंदे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्याचबरोबर त्यांनी आपल्या पत्नी सोबतचा एक फोटो ही ट्विटर वर शेअर केला आहे.
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदी विराजमान झाल्यानंतर जेव्हा ते स्वतःच्या मतदारसंघात पोहोचली तेव्हा कार्यकर्त्यांकडून मोठा जल्लोष करण्यात आला होता. यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या पत्नीला ता शिंदे यांनीही अनोख्या पद्धतीने जल्लोष साजरा केला होता. त्यांनी यावेळी चक्क मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी ड्रम वाजवला होता. लता शिंदे यांचा तो ड्रम वाजवताना चा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता.
जीवनातील बिकट व प्रतिकूल परिस्थितीत माझ्या पाठीशी तु खंबीरपणे उभी राहिलीस,सामाजिक, राजकीय जीवनात मी समर्पित होऊन कार्यरत असताना आपल्या संसाराचा गाडा जबाबदारीने व अतिशय मायेने हाकलास.तुझ्यासारखी सुजाण,सुज्ञ, मनमिळाऊ पत्नी लाभणे हे माझे बलवत्तर नशीब समजतो.लता,वाढदिवसाच्या शुभेच्छा. pic.twitter.com/nuIKfrt845
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) July 11, 2022
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
