🕒 1 min read
Ajit Pawar। मुंबई : काल शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाची बैठक मंत्रालयात पार पडली. या बैठकीत अनेक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. यानंतर पुढे आता हा मंत्रिमंडळ विस्तार दोन दिवसांत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोन्ही नेते दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यांमध्ये मंत्र्यांच्या यादीवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. यासंदर्भात आता विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार आज दुष्काळग्रस्त भागाच्या पाहणी दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलत असताना राज्य सरकारवर निशाणा साधला.
तसंच पुरग्रस्त भागात ओला दुष्काळ जाहीर करा अशी मागणी केली. आज अजित पवार गडचिरोली जिल्हाच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी केली आहे. यानंतर माध्यमांशी बोलताना अजित पवार म्हणाले, ‘मंत्रिमंडळ विस्तार होत नाहीये, दोघे म्हणतात आम्ही दोघे काम करतो आहे. मात्र, हे शक्य नाही. प्रत्येक फाईल मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्याकडे जाणार असेल तर ते शक्य नाही, असं ते म्हणाले.
तर पुढे अजित पवार म्हणाले कि, नुकसानग्रस्तांना लवकरात लवकर मदत मिळावी, त्याचबरोबर सरकारने पंचनामे करावेत अशी मागणी त्यांनी केली आहे. मुख्यमंत्र्यांनी मुंबईत बसून निर्णय घेऊ नये, पूरग्रस्त भागाची पाहणी करावी असा टोलाही त्यांनी एकनाथ शिंदे यांना यावेळी लावला आहे. गडचिरोली जिल्ह्यात दहा लाख हेक्टर जमीनी पूरामुळे बाधित झाल्या असून सरकारने लवकर ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी करण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Maharashtra Cabinet Expansion | एक महिन्याचे सरकार! मंत्रिमंडळ विस्ताराची प्रतीक्षा, मुख्यमंत्री शिंदे आज दिल्ली दौऱ्यावर
- Vinayak Raut on Ramdas Kadam | रामदास कदम बकवास माणूस आहे – विनायक राऊत
- MNS : उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांची मुलाखत म्हणजे काळू-बाळूचा तमाशा; मनसेची टीका
- Ajit Pawar : एवढं मोठं बहुमत मिळालं आहे, मग मंत्रिमडळ विस्तार का करत नाही?, अजित पवारांचा सवाल
- Shivsena : ‘प्रेताच्या टाळूवरचे लोणी खाणारे सरकार …’ सेनेचा शिंदे-फडणवीस सरकारवर गंभीर आरोप
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
