🕒 1 min read
Maharashtra Cabinet Expansion | मुंबई : राज्य मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चेदरम्यान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बुधवारी रात्री दिल्लीला रवाना होणार होते, मात्र त्यांचा दौरा रद्द करण्यात आला होता. दरम्यान आज (गुरुवार, 28 जुलै) ते दिल्ली दौऱ्यावर जाण्याची शक्यता आहे. सरकारला एक महिना होत आला तरी राज्या वाऱ्यावर आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सोडले तर राज्याला अजून कोणी मंत्री लाभला नाही. त्यामुळे शिंदे -फडणवीस सरकारला विरोधकांच्या टीकेचा सामना करावा लागत आहे.
मुख्यमंत्री कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काल सायंकाळी ७ वाजताच्या विमानाने दिल्लीला रवाना होणार होते आणि मुख्यमंत्री रात्री ९ वाजता महाराष्ट्र सदनात पोहोचणार होते. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी ३० जून रोजी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती.
शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या ४० आमदारांच्या बंडानंतर मागील महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आल्याने एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर शपथ घेतली. मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर शिंदे यांचा हा पाचवा दिल्ली दौरा आहे. यापूर्वी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर भाजप नेत्यांची भेट घेतली होती. यासोबतच त्यांनी शिवसेनेच्या १२ खासदारांच्या स्वतंत्र गटासह लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतली. अलीकडेच त्यांनी राष्ट्रपती म्हणून द्रौपदी मुर्मू यांच्या शपथविधी सोहळ्यालाही हजेरी लावली होती. मात्र शिंदेच्या या दिल्ली दौऱ्यात मंत्रिमंडळ विस्ताराचा मार्ग मोकळा होणार? असा प्रश्न उपस्थित केल्या जात आहे.
…मग मंत्रिमडळ विस्तार का करत नाहीत- अजित पवार
अजित पवार आज दुष्काळग्रस्त भागाच्या पाहणी दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलत असताना राज्य सरकारवर निशाणा साधला. तसंच पुरग्रस्त भागात ओला दुष्काळ जाहीर करा अशी मागणी केली. यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले, ‘मंत्रिमंडळ विस्तार होत नाहीये, दोघे म्हणतात आम्ही दोघे काम करतो आहे. मात्र, हे शक्य नाही. प्रत्येक फाईल मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्याकडे जाणार असेल तर ते शक्य नाही.
ते पुढे म्हणाले, सरकारला एवढं मोठं बहुमत मिळालं आहे. त्यांनी ते विधानसभेतही दाखविले आहे. मग मंत्रिमडळ विस्तार का करत नाहीत असा सवालही पवार यांनी यावेळी उपस्थित केला. शिवाय माझी अशी एकीव माहिती होती की, मुख्यमंत्री आज दिल्लीत जाणार आहे. मात्र ज्यांना त्यांना भेटायचे होते, कदाचित ते उपलब्ध नव्हते. अखेर दिल्लीतील श्रेष्ठींना संपूर्ण देशाचा कारभार पहायचं असतो. त्यामुळे आम्ही टीका करण्याचे कारण नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.
महत्वाच्या बातम्या :
- Ajit Pawar : एवढं मोठं बहुमत मिळालं आहे, मग मंत्रिमडळ विस्तार का करत नाही?, अजित पवारांचा सवाल
- Shivsena : ‘प्रेताच्या टाळूवरचे लोणी खाणारे सरकार …’ सेनेचा शिंदे-फडणवीस सरकारवर गंभीर आरोप
- Samana : उद्धव ठाकरे यांनी एक मुलाखत काय दिली, अन् राज्यात जणू भूकंपाचे हादरेच बसले
- Sandipan Bhumre : ‘हो एकनाथ शिंदेंना पक्षप्रमुख व्हायचेय’,पण…; संदिपान भूमरे स्पष्टचं बोलले
- Vinayak Raut : “शिंदे-फडणवीस यांच्या शुभेच्छांना आम्ही किंमत देत नाही”; विनायक राऊत आक्रमक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
