Share

Shivsena : ‘प्रेताच्या टाळूवरचे लोणी खाणारे सरकार …’ सेनेचा शिंदे-फडणवीस सरकारवर गंभीर आरोप

Published On: 

Shivsena । मुंबई : काल आणि परवा दोन दिवस शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीचे दोन्ही भाग प्रदर्शित झाले. शिवसेना खासदार आणि सामानाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी हि मुलाखत घेतली होती. यावेळी उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटावर जोरदार निशाणा साधलाय. यानंतर संजय राऊत हे वेळोवेळी सामनाच्या अग्रलेखातून विरोधकांवर निशाणा साधत असतात. त्यानंतर आज देखील राऊतांनी शिंदे सरकारवर टीका केली आहे.

तसेच उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील राजकीय वादळानंतर एक मुलाखत काय दिली, राज्यात जणू भूकंपाचे हादरेच बसले. ठाकरे यांच्या मुलाखतीवर क्रिया-प्रतिक्रिया सुरू झाल्या. समस्त शिवसेना विरोधक एकजुटीची वज्रमूठ आवळून बेताल वक्तव्ये करताना दिसत आहेत. एका मुलाखतीत इतकी ताकद असते हे यानिमित्ताने महाराष्ट्राला कळले, असंही सामानातून म्हंटल आहे.

पुढे दिल्लीपासून महाराष्ट्रापर्यंत खास पत्रकार परिषद घेऊन ‘ठाकरे-राऊत’ मुलाखतीवर खुलासे व हल्ले केले जात आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणातील ‘ठाकरे’ नामाचे महत्त्व अधोरेखित करणारे हे दृश्य आहे. ठाकरे यांनी मुलाखतीत त्यांची भूमिका व बाजू मांडली. घरातल्याच लोकांनी आपल्याबाबतीत कशी दगाबाजी केली याबद्दल मन मोकळे केले. इस्पितळातील अतिदक्षता विभागात झुंज सुरू असताना बाहेर सरकार उलथवून टाकण्यासाठी कसे ‘अघोरी’ प्रकार सुरू होते, त्यावर ठाकरे बोलले व तेच खरे फडणवीसांच्या संतापाचे कारण आहे.

ठाकरे-राऊत’ मॅच फिक्सिंग होती तर मग ठाकरे इस्पितळात असताना बाहेर सरकार पाडण्याच्या निर्घृण हालचाली सुरू होत्या, त्या फिक्सिंगला कोणते नाव द्यायचे? हे सर्व पाहिले की वाटते, प्रेताच्या टाळूवरचे लोणी खाणारे सरकार महाराष्ट्रात अवतरले आहे व महाराष्ट्राची अवस्था हे भकास करणार आहेत. असा गंभीर आरोप सामना अग्रलेखातून करण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!