Share

Ajit Pawar : एवढं मोठं बहुमत मिळालं आहे, मग मंत्रिमडळ विस्तार का करत नाही?, अजित पवारांचा सवाल

Published On: 

Ajit Pawar। मुंबई : काल शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाची बैठक मंत्रालयात पार पडली. या बैठकीत अनेक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. हि बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील पार पडली. यानंतर पुढे आता हा मंत्रिमंडळ विस्तार दोन दिवसांत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोन्ही नेते आज संध्याकाळी दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यांमध्ये मंत्र्यांच्या यादीवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. त्यामुळं यावेळी ते मंत्रिमंडळाची लिस्ट फायनल करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यासंदर्भात आता विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

अजित पवार आज दुष्काळग्रस्त भागाच्या पाहणी दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलत असताना राज्य सरकारवर निशाणा साधला. तसंच पुरग्रस्त भागात ओला दुष्काळ जाहीर करा अशी मागणी केली. यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले, ‘मंत्रिमंडळ विस्तार होत नाहीये, दोघे म्हणतात आम्ही दोघे काम करतो आहे. मात्र, हे शक्य नाही. प्रत्येक फाईल मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्याकडे जाणार असेल तर ते शक्य नाही.

ते पुढे म्हणाले, सरकारला एवढं मोठं बहुमत मिळालं आहे. त्यांनी ते विधानसभेतही दाखविले आहे. मग मंत्रिमडळ विस्तार का करत नाहीत असा सवालही पवार यांनी यावेळी उपस्थित केला. शिवाय माझी अशी एकीव माहिती होती की, आज दिल्लीत जाणार आहे. मात्र ज्यांना त्यांना भेटायचे होते, कदाचित ते उपलब्ध नव्हते. अखेर दिल्लीतील श्रेष्ठींना संपूर्ण देशाचा कारभार पहायचं असतो. त्यामुळे आम्ही टीका करण्याचे कारण नाही असा टोलाही त्यांनी लगावला.

महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!