Share

MNS : उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांची मुलाखत म्हणजे काळू-बाळूचा तमाशा; मनसेची टीका

Published On: 

Ramdas Kadam। मुंबई : शिवसेना खासदार आणि सामानाचे कार्यकारी संपादक संजय राऊतांनी उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतलेला पहिला भाग २६ जुलै ला प्रदर्शित झाला. या मुलाखतीवर राज्यासह संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. यामध्ये उद्धव ठाकरे यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. तसेच मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरे यांनी भाजप, एकनाथ शिंदे यांच्यावर चौफेर टीका केली. तर यानंतर काल मुलाखतीचा दुसरा भाग प्रदर्शित झाला. या मुलाखतीनंतर राजकीय वर्तुळातून उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर देण्यात येत आहेत. मनसेकडून देखील यावर टीका करण्यात आली आहे. मनसे नेते प्रकाश महाजन यांनी टीका केली आहे.

प्रकाश महाजन यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांची मुलाखत म्हणजे काळू-बाळूचा तमाशा, अशी खोचक टीका केली आहे. त्यांनी एका खासगा वृत्तवाहिनीला मुलाखत दिली आहे. पुढे ते म्हणाले कि ठाकरे यांची मुलाखत बघण्याची माझी फारशी इच्छा झाली नाही. मात्र मी थोडक्यात बघितली. मुलाखत बघून मला महाराष्ट्रात काही वर्षांपूर्वी काळू-बाळू नावाचा एक प्रसिद्ध तमाशा होता. या तमाशाचीच आठवण झाली, असं ते म्हणाले.

तर पुढे ते म्हणाले कि, इकडून जय महाराष्ट्र म्हटलं की तिकडून जय महाराष्ट्र म्हणायचं. मात्र हे म्हणताना मांजर तरी ‘म्याव’ जोरात म्हणते असं माजी मुख्यमंत्री ठाकरेंच्या तोंडून निघत होतं. मात्र, आता ठाकरे का मुलाखत का देत आहेत हे कळत नाही. बापदाद्यांची कमावलेली इस्टेट त्यांनी गमावली अन् आता पडक्या वाड्यात बसून मुलाखत देत आहेत, अशा खोचक शब्दात महाजनांनी ठाकरेंवर हल्लाबोल केला.

महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!