औरंगाबाद : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलेल्या बेताल वक्तव्याविरोधात आज मंगळवारी सकाळी क्रांतीचौक पोलीस ठाण्यात शिवसेना प्रवक्ते जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे यांनी तक्रार दाखल केली आहे. संतप्त शिवसैनिकांसह छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, क्रांतीचौकात शिवसेना प्रवक्ते जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली राणेंच्या फोटोला जोडे मारो आंदोलन केले. राणेंच्या ‘कोंबडीचोर’ या उपाधीला साजेशा जिवंत कोंबड्या देखील या आंदोलनात आणल्या गेल्या होत्या असे शिवसैनिकांनी सांगितले.
केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात केलेलं वक्तव्य त्यांना भोवण्याची शक्यता असून त्यांना अटक करण्याचे आदेश नाशिक पोलीसांनी दिले आहेत. दरम्यान राणेंच्या विरोधात नाशिकमध्ये शिवसैनिक आक्रमक झाले असून आता राणे विरुद्ध शिवसेना वाद चांगलाच तापल्याचं दिसत आहे. नारायण राणेंच्या वक्तव्यानंतर शिवसैनिक नाशिकमध्ये आक्रमक नाशिकमधील भाजपच्या कार्यालयावर (ता.२४) दगडफेक झाली. याबाबत चौकशी करून अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्याबाबत नाशिकचे पोलीस उपायुक्त अमोल तांबे यांनी माहिती दिली होती. दरम्यान भाजप कार्यालयावर दगडफेक केलेल्या शिवसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
तर औरंगाबाद येथे संतप्त शिवसैनिकांसह क्रांती चौकात राणेंच्या फोटोला जोडे मरो आंदोलन करण्यात आले. ‘कोंबडीचोर’ या उपाधीला साजेशा कोंबड्या देखील या आंदोलनात आणल्या गेल्या होत्या. कोंबड्या सोडून, कोंबडीचोराने आता एवढेच काम करावे. असा टोला अंबादास दानवे यांनी यावेळी लगावला. दरम्यान, पुणे, नाशिक, महाड आणि औरंगाबादमध्ये शिवसेनेकडून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- औरंगाबादेत शिवसेना आक्रमक! कोंबड्या सोडत नारायण राणेंच्या पोस्टरला मारले जोडे
- नारायण राणेंच्या घराबाहेर शिवसेना-भाजप कार्यकर्त्यांचा तुफान राडा, पोलिसांचा लाठीचार्ज; पाहा हा व्हिडिओ
- ‘नारायण राणे छक्का है, नारायण राणे भडवा है!’, संतप्त शिवसैनिकांची घोषणाबाजी
- ‘माझी बदनामी केली तर तुमच्याविरोधात गुन्हा दाखल करेन’, नारायण राणेंची वृत्तवाहिन्यांना धमकी
- ‘मुख्यमंत्री ठाकरेंकडून राष्ट्रदोह घडला, त्यावेळी का शांत होतात?’ राणे पत्रकारांवर घसरले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

