मुंबई : मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीवरील सर्वोच्च न्यायालयाची तात्पुरती मनाई मागे घेण्यासाठी घटनापिठाची स्थापना करून तातडीने सुनावणी करण्याच्या राज्य शासनाच्या मागणीला यश आले असून, येत्या ९ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजता पाच सदस्यीय घटनापिठासमोर यासंदर्भात सुनावणी होणार आहे.
मात्र घटनापिठासमोरील सुनावणी, महाराष्ट्र सरकार तयार असल्याचं सांगतानाच, दुसरी बाजूही भक्कम असायला हवी, असे मत खासदार संभाजीराजे भोसले यांनी व्यक्त केलं आहे. संभाजीराजेंनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन उद्याच्या सुनावणीसंदर्भात माहिती देताना सरकारला प्रश्नही विचारला आहे.
‘आपण सर्वजण ०९.१२.२०२० ची आतुरतेने वाट पाहत आहोत. माझ्या माहितीप्रमाणे राज्य सरकारचा स्टे वेकेट करण्यासंबंधीचा अर्ज सुनावणीसाठी घटनापीठासमोर लागलेला आहे. जर मा. सर्वोच्च न्यायालायने सरकारचा अर्ज मान्य केला तर मी मराठा समाजच्या वतीने सरकारच खूप अभिनंदन करेन. पण जर काही कारणाने घटनापीठाने अर्ज मान्य केला नाही तर? घटनापीठाने सरकारला १०२ व्या घटनादुरुस्तीवर म्हणणे मांडायला सांगितले तर? सरकारने यासाठी पण तयारी ठेवली पाहिजे. आता प्रकरण तहकूब करणे हे समाजाच्या हिताचे नाही. जर स्टे वेकेट झाला नाही तर सरकारने १०२ व्या घटनादुरुस्तीवर म्हणणे मांडण्याची सुद्धा तयारी ठेवली पाहिजे. आपण अनिश्चिततेची तलवार किती दिवस मराठा समाजाच्या डोक्यावर ठेवणार. एकदाचा ह्या केसचा निपटारा होणं गरजेचं आहे’. अस संभाजीराजे म्हणाले आहेत.
आपण सर्वजण ०९.१२.२०२० ची आतुरतेने वाट पाहत आहोत. माझ्या माहितीप्रमाणे राज्य सरकारचा स्टे वेकेट करण्यासंबंधीचा अर्ज सुनावणीसाठी घटनापीठासमोर लागलेला आहे.
जर माननीय सर्वोच्च न्यायालायने सरकारचा अर्ज मान्य केला तर मी मराठा समाजच्या वतीने सरकारच खूप अभिनन्दन करेन.
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) December 7, 2020
पण जर काही कारणाने घटनापीठाने अर्ज मान्य केला नाही तर?
घटनापीठाने सरकारला १०२ व्या घटनादुरुस्तीवर म्हणणे मांडायला सांगितले तर?
सरकारने यासाठी पण तयारी ठेवली पाहिजे.
आता प्रकरण तहकूब करणे हे समाजाच्या हिताचे नाही.
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) December 7, 2020
जर स्टे वेकेट झाला नाही तर सरकारने १०२ व्या घटनादुरुस्तीवर म्हणणे मांडण्याची सुद्धा तयारी ठेवली पाहिजे.
आपण अनिशचतेची तलवार किती दिवस मराठा समाज्याच्या डोकयावर ठेवणार. एकदाचा ह्या केसचा निपटारा होणं गरजेचं आहे.
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) December 7, 2020
महत्वाच्या बातम्या
- भाजप खोट्या पध्दतीने पवारसाहेबांचे पत्र फिरवत आहे; राष्ट्रवादीची सारवासारव
- काही पक्षांना राजकीय स्मृतीभ्रंशाचा आजार झालाय; मुनगंटीवारांचा शिवसेनेला टोला!
- …म्हणूनच विरोधी पक्ष अस्तित्व टिकवण्यासाठी कोणत्याही आंदोलनात उडी घेत आहेत : रविशंकर प्रसाद
- मोदी सरकार जबरदस्तीने शेतकरी आंदोलनाला चिरडण्याचा प्रयत्न करीत आहे : राष्ट्रवादी
- ‘माझ्यावर निशाणा साधा मीडियाचे लाडके व्हा! आणि शिवसेनेचे तिकीट मिळवा’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

