मुंबई : कंगनाने शेतकरी आंदोलनात सहभागी झालेल्या वयोवृद्ध महिलेबाबत ट्विट केलं होतं की, ‘ही १०० रूपयात अव्हेलेबल आहे. शाहीन बागमध्येही हीच महिला होती आणि आता शेतकरी आंदोलनातही तिच आहे’.कंगनाच्या या ट्विट मुळे सर्वत्र आक्रोश पाहायला मिळत होता या ट्विट मुळे कंगना बरीच ट्रोल झाली नंतर कंगना कडून हे ट्विट डिलीट करण्यात आले होते.
याच मुद्द्यावरून अभिनेता व गायक दिलजीत दोसांजने कंगनाला सुनावले आणि कंगना अशीच पेटून उठली. दिलजीतवर पलटवार करताना तिने सर्व मर्यादा लांघल्या. अगदी दिलजीतला करण जोहरचा ‘पालतू’ म्हणूनही हिणवले. त्यावरुन अभिनेता-गायक दिलजीत दोसांजने तिची चांगलीच शाळा घेतली आणि दोघांमध्ये ट्विटर वॉर सुरुवात झाली. नंतर ते ट्विट कंगनाला डिलीट करावे लागले होते. आता आपल्यावर टीका करणाऱ्यांना कंगनाने निशाणा साधणारे ट्विट कले आहे.
तिचे समर्थन करणाऱ्यांच्या ट्विटला उत्तर देत कंगनाने लिहिले की, तुम्ही काय म्हणता? या देशातील सध्या मी हॉटेस्ट टार्गेट आहे. माझ्यावर निशाणा साधा आणि मीडियाचे लाडके व्हा. तुम्हाला मूव्ही माफिया द्वारे रोल ऑफर केले जातील. चित्रपटात तुम्हाला काम दिले जाईल. फिल्मफेअर अवॉर्ड तुम्हाला मिळणार आणि शिवसेनेचे तिकीटही मिळणार. मी जर डॉन असती तर तुम्हाला माहीत आहेच. ७२ देशांचे पोलीस माझ्या मागावर असते.
What you saying ! I am the hottest target in the country right now, target me and you will become media’s favourite, movie mafia will offer you roles, give you movies, filmfare award, shiv Sena tickets every thing. If I were a don you know 72 mulkon ki police mere peeche hoti ???? https://t.co/wEbMTsl1DW
— Kangana Ranaut (@KanganaTeam) December 5, 2020
महत्वाच्या बातम्या
- पुणे शहरात दिल्लीप्रमाणे कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता कमीच ?
- घराबाहेर बॅरिकेट्स लावत अखिलेश यादवांना शेतकरी आंदोलनात सामील होण्यापासून रोखलं !
- ‘कृषी कायद्यांना विरोध करून आज आरडाओरडा करणारे राज्यसभेत मूग गिळून गप्प का बसले होते’ ?
- शुटिंग दरम्यान मनीष पॉलला कोरोनाची लागण
- मोदी सरकारला दणका! सुप्रीम कोर्टाने दिली नव्या संसद भवनाच्या निर्मितीला तात्पुरती स्थगिती


