सातारा : लॉकडाऊन विरोधात राज्यभरात रोष व्यक्त होत असतांना राज्य शासनाने आणखी कडक निर्बंध घालण्याचे संकेत दिले आहेत. या विरोधात अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. छत्रपती उदयनराजे भोसले यांनी तर चक्क कटोरा समोर घेत राज्य शासनाच्या निर्णयाला विरोध केला आहे. लॉकडाऊनमुळे सर्वसामान्य व्यक्तीवर कटोरा हातात घेण्याचीच वेळ आली असल्याचा आरोप या वेळी उदयनराजे यांनी केला आहे.
सातारामधील पोवई नाका परिसरातील छत्रपती उदयनराजे यांनी गोणपाट म्हणजेच पोत टाकत त्यावर ठिय्या मांडला. इतकच नाही तर समोर कटोरा देखील ठेवलाय. राज्य शासनावर होत असलेले भ्रष्ट्राचाराचे आरोप लपवण्यासाठी राज्य सरकार लॉकडाऊन लावत असल्याचा आरोपही या वेळी उदयनराजे यांनी केला. वाझे प्रकरणातून भ्रष्ट्राचाराची नावे समोर आली आहेत. हा पैसा गरीबांना वाटायला हवा, अशी मागणी देखील त्यांनी केली.
राज्य सरकारच्या लॉकडाऊन आणि भ्रष्ट्राचार या दोन्ही मुद्यांवर त्यांनी प्रशासनाला धारेवर धरले. राज्यात कोरोनामुळे अनेकांचा मृत्यू झाला आहे. त्यासाठी ठाकरे सरकार जबाबदार असल्याचा आरोपही या वेळी उदयनराजे यांनी केला आहे. आरोग्य सुविध आणि लस नियोजन करण्यात राज्य सरकार अपयशी ठरले असल्याचा आरोपही त्यांनी केला.
महत्त्वाच्या बातम्या
- खोट्या बातम्यांचा प्रसार थांबवण्यासाठी फेसबुक करणार पेजला लेबलींग
- म्यानमारमधील हिंसाचाराबाबत संयुक्त राष्ट्रसंघात भारताने घेतली भूमिका
- पुरस्कार मिळाल्यांनतर तापसीकडून कंगनाची स्तुती ; कंगना म्हणाली…
- जोपर्यंत देवेंद्र फडणवीस ठाकरे सरकार चालू देतील तोपर्यंतच हे सरकार चालणार : आठवले
- तुळजाभवानी मंदिर संस्थान पुजाऱ्यांना पावले, किराणा साहित्य देण्याचा निर्णय
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

