नवी दिल्ली: समाज माध्यमे मध्ये नेहमीच ग्राहकांना नवनवीन अद्ययावत सेवा दिल्या जातात. मात्र अनेकदा यांच्या माध्यमातून वेगवेगळ्या समाजविघातक अफवांना खतपाणी घातलं जातं यासाठी अनेकदा समाज माध्यमांना जबाबदार देखील धरला जात. या पार्श्वभूमीवर फेसबुकने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
आता वापरकर्त्यांना ते फॉलो करत असलेले किंवा बघत असलेले फेसबुकवरील पेज कशासंदर्भात आहे, हे लवकर समजण्यासाठी कंपनीने यापूर्वीच महत्त्वाचे बदल केले आहेत. यामध्ये उपहासात्मक (सटाईर) मजकुरावर थेट सटाईर असे लेबलिंग केले जाणार आहे. त्यानंतर कंपनीने अमेरिकेतील वापरकर्त्यांसाठी काही प्रयोग करण्यास सुरुवात केली आहे.
फेसबुकवरील पेज कशासंदर्भात आहे, हे वापरकर्त्यांना लवकर समजण्यासाठी कंपनीने यापूर्वीच महत्त्वाचे बदल केले आहेत. त्यानंतर कंपनीने अमेरिकेतील वापरकर्त्यांसाठी काही प्रयोग करण्यास सुरुवात केली आहे.
या आधी देखील फेसबुकने जूनमध्ये काही पोस्ट या सरकारच्या अंशत: अथवा पूर्णपणे संपादकीय नियंत्रणाखाली असल्याचे लेबलिंग करण्यास सुरुवात केली होती. यावर फेसबुकने स्पष्टीकरणही दिले होते. काही बातम्या या सरकारच्या प्रभावाखाली असू शकतात. याबाबत लोकांना माहित असणे गरजेचे आहे. फेसबुकवरील पेजवर असलेले मेम्स अनेकदा राजकीय टीकांमुळे चर्चेत येत असतात. असे मेम्सही यापुढे सटाईर या लेबलने येत्या काळात दिसणार आहेत
महत्वाच्या बातम्या
- तुळजाभवानी मंदिर संस्थान पुजाऱ्यांना पावले, किराणा साहित्य देण्याचा निर्णय
- लातूर जिल्हा; नागरिकांना घरी बसवण्यासाठी तहसीलदार उतरले रस्त्यावर
- हा कोरोनाचा नवा विषाणू आहे त्याला थांबवायचे असेल तर कडक निर्बंध आवश्यकच – उद्धव ठाकरे
- विनामास्क सामना पाहत बसलेल्या जय शाह यांच्यावर नेटीझंन्स भडकले, कारवाईची होतेय मागणी
- विराटच्या एका निर्णयावर युवराजची जहरी टीका


