मुंबई: कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची दाट शक्यता असतानाच आता एक गंभीर माहिती समोर आली आहे. २००० हून अधिक प्रवासी कोरोनाच्या संसर्गामुळे मुंबई-गोवा क्रूझवर (Mumbai-Goa Cruise) अडकले असल्याचे समोर आले आहे. रविवारी रात्रीपासून हे प्रवासी क्रूझवर अडकले आहेत. कूझवरील क्रू मधील काही सदस्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. दरम्यान गोवा सरकारने क्रूझवरील प्रवाशांना चाचणीशिवाय उतरण्यास नकार दिला आहे.
कॉर्डेलिया हे क्रूझ जहाज मुंबईहून गोव्याला आले आहे. त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे. जहाजातील प्रवाशांची एका खासगी हॉस्पिटलद्वारे चाचणी केली जात आहे. प्रवाशांची चाचणी केल्यानंतर आणि त्यांचे रिपोर्ट आल्यानंतरच सर्व प्रवशांना गोव्यात उतरू दिले जाईल, असे गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी म्हटले आहे.
दरम्यान क्रूझवरील क्रू मेंबरमधील एक सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. सध्या क्रूझवर एकूण २०१७ प्रवासी आहेत. तर आत सर्व क्रूझवरील प्रवाशांची RT-PCR चाचणी करण्यात येत आहे.
महत्वाच्या बातम्या:
- …तर महाराष्ट्रातही बंगालसारखी स्थिती निर्माण होईल- विजय वडेट्टीवार
- “तुम्ही खरे की उद्धव ठाकरे?”; भाजपचा आदित्य ठाकरेंना सवाल
- प्रवीण दरेकरांचा तिन्ही पक्षांना ‘जोर का झटका धीरे से..!’, चित्रा वाघ यांचा टोला
- अभिनेता जॉन अब्राहम आणि पत्नी प्रियाला कोरोनाची लागण
- “१० मंत्री आणि २० आमदारांना कोरोना झाला…”,अजित पवारांनी दिले लॉकडाऊनचे संकेत

