Share

भाजप खासदाराचे जे.पी नड्डा यांना पत्र, स्वत: भगवान कृष्णाने प्रेरित केल्याचे सांगत केली ‘ही’ मागणी

Published On: 

🕒 1 min read

मैनपुरी : भाजपचे राज्यसभा खासदार हरनाथ सिंह यादव(Harnath Singh Yadav) यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी नड्डा(J P Nadda) यांना पत्र लिहून आगामी विधानसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना मथुरा येथून उमेदवारी देण्याची विनंती केली आहे. तसेच पक्षाध्यक्षांना लिहिलेल्या पत्रात यादव यांनी म्हटले आहे की, ‘हे पत्र लिहिण्यासाठी स्वत: भगवान कृष्णा यांनी प्रेरित केले आहे.’

यादव यांनी त्यांचे पत्र ट्विटरवर पोस्ट केले असून पत्रात यादव म्हणाले आहेत की,’राज्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील मतदारांची इच्छा असेल की माननीय योगीजींनी त्यांच्या विधानसभेच्या निवडणुका घ्याव्यात, परंतु मी तुम्हाला अत्यंत नम्र शब्दात विनंती करतो की ब्रज प्रदेशातील लोकांची विशेष इच्छा आहे की पूज्य योगीजींनी मथुरा, भगवान श्री कृष्णजींच्या नगरीतून निवडणूक लढवावी.’ तसेच हे पत्र लिहिण्यासाठी स्वतः भगवान श्रीकृष्णांनी मला प्रेरणा दिली आहे, असेही ते म्हणाले.

दरम्यान, यादव हे मैनपुरीचे रहिवासी असून एकेकाळी यादव यांना मुलायमसिंह यादव यांच्या जवळचे मानले जात होते, परंतु २०१४ मध्ये परिषद निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. २०१८ मध्ये भाजपने त्यांना राज्यसभेचे खासदार केले.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!