🕒 1 min read
औरंगाबाद: काँग्रेस धर्मनिरपेक्ष पक्ष आहे. मात्र ओबीसी समाजातील महिलांची आत्तापर्यंत औरंगाबाद शहरात अध्यक्ष म्हणून नियुक्ती झालेली नाही. आत्तापर्यंत नेहमी मराठा समाजातील महिलांना प्राधान्य देण्यात आले आहे. याबाबत प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्षा संध्या सव्वालाखे यांच्या कानावर हा विषय घातला होता. मात्र पुन्हा झालेल्या नियुक्त्यांमध्ये मराठा समाजातील महिलांना प्राधान्य देण्यात आले आहे. त्यामुळे ओबीसी समाजातील महिला अध्यक्ष चालत नाही का? असा सवाल माजी शहर जिल्हाध्यक्ष उज्वला दत्त(Ujwala Dutt) यांनी ‘महाराष्ट्र देशा’शी बोलतांना उपस्थित केला.
औरंगाबाद शहरातील महिला काँग्रेसमध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत. दोन्ही शहराध्यक्षांना पदावरुन काढण्यात आले आहे. त्यामुळे महिला काँग्रेसमध्ये नाराजीचे वातावरण पसरले असून शहरातील महिला काँग्रेसच्या पदाधिकारी लवकरच प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची भेट घेऊन आपले गाऱ्हाणे त्यांच्यासमोर मांडणार आहेत. याबाबत काँग्रेसच्या माजी शहर-जिल्हाध्यक्ष उज्ज्वला दत्त यांनी नुकत्याच झालेल्या निवडींवर सणसणीत टिका केली आहे. त्या म्हणाल्या, राज्यात आता महाविकास आघाडीची सत्ता आहे. काँग्रेसचाही त्यात सहभाग आहे. मात्र जेव्हा काँग्रेस सत्तेत नव्हती. त्यावेळी शहरात महिला काँग्रेसची कामे आम्ही केली.
आंदोलन, प्रचार, सभा सर्व गोष्टींमध्ये आम्ही आघाडीवर होतो. आणि आता सत्ता असतांना ज्यांनी कधीही कामे केली नाही अशांची नियुक्ती झाली आहे. जर या पक्षात काम करून आम्हाला न्याय मिळत नसेल, तर फायदा? आम्ही याबाबत वरिष्ठांकडे तक्रार करणार आहोत. मात्र तरीही न्याय मिळाला नाही तर आम्ही सर्व महिला पदाधिकारी राजीनामा देऊ. अशी भूमिका दत्त यांनी केली आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी हेमा पाटील, तर शहराध्यक्षपदी अंजली वडजे यांची नियुक्ती झाली आहे. या फेरबदलामध्ये विद्यमान शहराध्यक्ष सीमा थोरात यांना कार्यकारी कमिटी सदस्यपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- …तर महाराष्ट्रातही बंगालसारखी स्थिती निर्माण होईल- विजय वडेट्टीवार
- “तुम्ही खरे की उद्धव ठाकरे?”; भाजपचा आदित्य ठाकरेंना सवाल
- विराट कोहली माध्यमांसमोर कधी येणार?; राहुल द्रविडने केला खुलासा
- प्रवीण दरेकरांचा तिन्ही पक्षांना ‘जोर का झटका धीरे से..!’, चित्रा वाघ यांचा टोला
- अभिनेता जॉन अब्राहम आणि पत्नी प्रियाला कोरोनाची लागण
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
