नवी दिल्ली : अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज क्विंटन डी कॉकने (Quinton de Kock) कसोटी क्रिकेटमधून अचानक निवृत्ती घेतल्याने दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार डीन एल्गरला (Dean Elgar) धक्का बसला आहे. मात्र, आपला संघ या धक्क्यातून सावरेल आणि भारताविरुद्धच्या सध्याच्या कसोटी मालिकेत बरोबरी साधण्याचा प्रयत्न करेल, अशी आशा दक्षिण आफ्रिकेच्या कर्णधाराला आहे.
डी कॉकने भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यानंतर वयाच्या अवघ्या 29 व्या वर्षी कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. सेंच्युरियनमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण 113 धावांनी पराभव स्वीकारावा लागला.
क्विंटन डी कॉकच्या निवृत्तीवर डीन एल्गर म्हणाला, “मला खूप धक्का बसला. पण जेव्हा मी क्विंटन डी कॉक सोबत बसलो तेव्हा त्याने त्याची कारणे सांगितली मी त्याच्या निर्णयाचा आदर करतो. त्याच्या निवृत्तीचा इतर खेळाडूंवर परिणाम होईल का असे विचारले असता तो म्हणाला, ”मला वाटत नाही की कोणत्याही खेळाडूवर त्याचा परिणाम होईल. आता आंतरराष्ट्रीय खेळाडूंप्रमाणे काम करून पुढे जाण्याची जबाबदारी आमची आहे. आपण याबद्दल व्यावसायिक असणे आवश्यक आहे. आम्ही सध्या कसोटी मालिकेच्या मध्यावर आहोत, त्यामुळे डी कॉकच्या निवृत्तीचा कोणावरही परिणाम होईल असे मला वाटत नाही.
महत्वाच्या बातम्या:
- ‘एकमेकाला ओरबाडण्याचा प्रयत्न करणाऱ्या समाजाला सावित्रीबाईंनी सत्कार्याचा आदर्श घालून दिला’
- युगायुगांच्या बेड्या तोडणाऱ्या सावित्रीबाई रणरागिणी होत्या- अमोल कोल्हे
- ‘सावित्रीबाईंनी जे कार्य केले,त्याचे मोजमाप कोणत्याच परिमाणात करता येणं अशक्य’
- ‘सुप्रिया सुळे थापा मारताय की हे सगळेच लोकप्रतिनिधी…’, भातखळकरांचा हल्लाबोल
- ‘अंधेर नगरी घरी बसला राजा’, म्हाडा आणि एमपीएससीच्या परीक्षेवरून भातखळकरांचे टीकास्त्र
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

