नाशिक: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी (Nirmala Sitharaman) आज दिनांक १ फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प (Budget 2022) सादर केला. यात त्यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या. त्याच सोबत शेतकऱ्यांसाठी देखील अनेक महत्वपूर्ण योजनांची घोषणा केली आहे. मात्र या अर्थसंकल्पावरून विरोधी पक्षांनी केंद्र सरकारवर सडकून टीका करायला सुरुवात केली आहे. यात कॉंग्रेस (Congress) तसेच राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांनी देखील जोरदार टीका केली आहे.
राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी देखील या अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देताना टीका केली आहे. हे अर्थसंकल्प म्हणजे निवडणुकांसाठी घोषणाबाजी असल्याची टीका ठाकरे यांनी केली होती. तसेच महिला व बालकल्याणमंत्री यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांनी देखील टीका केली आहे. पगारदार आणि मध्यमवर्गाच्या तोंडाला पाने पुसणारा अर्थसंकल्प. कोविड काळात संकटात सापडलेल्या मध्यमवर्गासाठी आयकरात कुठलाच बदल किंवा सवलत नाही. हे सरकार संवेदनशील नाही, अशा शब्दात त्यांनी टीका केली आहे.
या अर्थसंकल्पावर आता राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी देखील ट्विट करत टीका केली आहे. निव्वळ आपल्या भाषणातून भूलभूलय्या करत सर्वसामान्य नागरिकांच्या पदरी निरशा देण्यापलीकडे सरकारच्या अर्थसंकल्पात ठोस काही दिसत नाही, असं छगन भुजबळ म्हणाले. पुढे बोलताना भुजबळ म्हणाले, अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज आपल्या भाषणातून अर्थसंकल्प सादर केला खरा मात्र निव्वळ घोषणाबाजी पलीकडे ठोस काहीही मिळाले नसून केंद्राने अर्थसंकल्पातून शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांची घोर निराशा केली आहे. केंद्राचा हा अर्थसंकल्प म्हणजे ‘खोदा पहाड आणि निकाला चूहा’, अशा शब्दात टीका केली आहे.
महत्वाच्या बातम्या:
IPL २०२२: आयपीएल ऑक्शनसाठी मोठ्या खेळाडूंच्या नावांची यादी जाहीर
दिशा पटानीने केली जबरदस्त बॅकफ्लिप, पाहून टायगर श्रॉफ झाला थक्क्!
“देशातील दोनचार श्रीमंत आणखी किती श्रीमंत होत जातात पाहूच”, संजय राऊतांची अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया
‘अर्थसंकल्पात देशवासीयांची फसवणूक’; शिवसेना नेते विनायक राऊतांची टीका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

