🕒 1 min read
औरंगाबाद: कोरोनानंतर हा अर्थसंकल्प बजेट येत असल्याने शेतकरी, सामान्य नागरिक, युवा वर्ग प्रत्येकालाच या बजेटकडून खूप अपेक्षा होत्या. शेतकरी आधीच हवालदिल झालेला आहे. मात्र त्याला या अर्थसंकल्पातून ठेंगा मिळालेला आहे. तसेच भाववाढीचा मोठा फटका बसलेले सामान्य नागरिक ज्यांना पेट्रोल, डिझेलचे दर कमी होतील अशी अपेक्षा होती त्यांनादेखील निर्मला सीतारमण यांनी ठेंगा दाखवला आहे. अशी प्रतिक्रिया औरंगाबादचे एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील(Imtiyaj Jaleel) यांनी नुकत्याच सादर झालेल्या अर्थसंकल्पीय बजेटवर दिली आहे.
आज अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांनी अर्थसंकल्प सादर केला आहे. यात त्यांनी अनेक महत्वाच्या घोषणा केल्या आहेत. १ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्यास सुरुवात झाली. तब्बल ६० लाख नव्या नोकऱ्या, ४०० नव्या वंदे भारत ट्रेन अशा धडाकेबाज घोषणांनी बजेटची ओपनिंग केली. मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील हा तिसरा अर्थसंकल्प आहे. रेल्वे, रस्ते, हवाई, जल वाहतुकीत मोठी गुंतवणूक केली जाईल, अशी घोषणा केली आहे.
मात्र विरोधी पक्षांकडून अर्थसंकल्पावर मोठ्या प्रमाणावर टीका होत आहे. एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार इम्तियाज जलील यांनी देखील अर्थसंकल्पावरुन मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अर्थसंकल्पाकडून मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी शेतकरी, युवावर्ग आणि सामान्य नागरिक तिघांनाही ठेंगा दाखवला आहे. शेतकरी आधीच अडचणीत असतांना अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा नाही. तसेच बेरोजगार असलेल्या युवकांसाठी देखील ठेंगाच दाखवण्यात आला आहे.
महागाईची झळ सोसणाऱ्या सामान्य नागरिकांना आता तरी पेट्रोल डिझेलचे भाव कमी होतील अशी अपेक्षा होती. मात्र त्यांच्या पदरात देखील पुन्हा एकदा निराशाच पडली आहे. तसेच क्रिप्टो करन्सीचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र ज्यामुळे देशाच्या करन्सीवर मोठा परिणाम होईल, अशा या मुद्द्यावर संसदेत चर्चा न करताच तो पारित कसा केला? हा प्रश्न जलील यांनी उपस्थित केला. तसेच प्रामाणिकपणे टॅक्स भरणाऱ्या नागरिकांसाठी देखील बजेटमध्ये कुठलीही नवी तरतूद करण्यात आलेली नसल्याची खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
महत्वाच्या बातम्या:
- आगामी वेस्टइंडीज विरुद्ध इंडिया टी-२० मालिकेसाठी ममता बनर्जी सरकारचा मोठा निर्णय
- “राजाला जर कल्याण साधायचं असेल…”, अर्थसंकल्पादरम्यान निर्मला सीतारामण यांनी दिला महाभारताचा संदर्भ
- टी २० वर्ल्ड कप मधील गोलंदाजी विषयी हार्दिक पंड्याने केला मोठा खुलासा
- नासाची एक चूक अन् अंतराळवीर कल्पना चावलाचा अंत..! वाचा नेमकं काय घडलं होतं?
- ‘माध्यमवर्गाच्या तोंडाला पाने पुसणारा अर्थसंकल्प’; यशोमती ठाकूर यांची टीका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
