मुंबई : बॉलिवूड सेलिब्रिटींना त्यांच्या फिटनेसकडे खूप लक्ष द्यावं लागतं. काही कलाकार स्वत:ला फिट ठेवण्यासाठी भरपूर मेहनत घेत असतात. त्यात तसेच अभिनेत्री दिशा पाटणीचे (Disha Patani) नाव आवर्जून घ्यावं लागेल. तिचा फिटनेस रूटीन तसेच नवीन गोष्टी शिकण्याची आवड आहे. दिशाने इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती बॅकफ्लिप (backflip) करतांना दिसत असून टायगरने देखील थक्क् झाला आहे.
दरम्यान दिशा पटानीने बॅकफ्लिप करतानाचा एक व्हिडीओ तिच्या इंटस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. या व्हिडीओत दिशाचा बॅकफ्लिप खूपच जबरदस्त होता. हे पाहून दिशाचा बॉयफ्रेंड टायगर श्रॉफला (Tiger Shroff) देखील धक्का बसला आहे. या व्हिडीओमध्ये दिशा लाल रंगाचा पोशाख परिधान करून फ्लिप करतांना दिसत आहे. दिशाच्या या लूकने प्रभावित झालेल्या टायगरने या व्हिडिओवर ‘क्लीन’ अशी कमेंट केली आहे. यासोबतच तो टाळया वाजवून हार्ट आय आणि इमोजी शेअर केलं आहे.
यापूर्वी दिशाने बिकनी फोटोशूट शेअर करून सर्वांची मने जिंकली होती. ती अनेकदा बोल्ड शुटमधील फोटो शेअर करत असून हे फोटो प्रचंड व्हायरल देखील झाले आहेत. दिशाच्या आगामी प्रोजेक्टबद्दल सांगायच तर ती लवकरच ‘एक व्हिलन रिटन्स’ या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात जॉन अब्राहम, अर्जून कपूर आणि तारा सुतारिया दिसणार आहेत.
महत्वाच्या बातम्या
- ‘हे निवडणुकीचं बजेट’; आदित्य ठाकरेंची टीका
- नितेश राणेंना मोठा धक्का; सिंधुदुर्ग न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला
- “माझं कुठलं पात्र तुम्हाला आवडतं?”, दीपिका पादुकोणच्या प्रश्नावर पती रणवीर उत्तरला…
- सोयगाव नगरपंचायतीमधील ४ सदस्यांचा भाजपला रामराम; शिवसेनेत प्रवेश, सत्तारांचा रावसाहेब दानवेंना झटका!
- आगामी वेस्टइंडीज विरुद्ध इंडिया टी-२० मालिकेसाठी ममता बनर्जी सरकारचा मोठा निर्णय


