🕒 1 min read
पुणे : राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत(Uday Samant) हे आज(१३ फेब्रु.)पुण्यातील बारामती दौऱ्यावर असून तेथील कृषी प्रदर्शनाला भेट दिल्यानंतर सामंत यांनी विविध मुद्द्यांवरून प्रसार माध्यमांशी संवाद साधला. तसेच हिंदुस्थानी भाऊ प्रकरणावरही प्रतिक्रिया दिली.
यासंदर्भात बोलत असतांना उदय सामंत म्हणाले की,‘हिंदुस्थानी भाऊला आपणच मोठं करत असतो, त्यांचे विकास फाटक हे नाव चांगले आहे. कुणाच्या तरी नादाला लागून आपले करियर वाया घालू नका, कुठल्या भाऊचे ऐकू नये,’ असे उदय सामंत म्हणाले.
दरम्यान, ३१ जानेवारी रोजी युट्युबर विकास फाटक उर्फ हिंदुस्तानी भाऊने परीक्षेबाबत अफवा पसरवल्यामुळे हजारो विद्यार्थ्यांनी(student aggression After the rumor of Hindustani Bhau) मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद अशा वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन केली. विद्यार्थ्यांच्या या गोंधळामुळे बराच वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांना विद्यार्थ्यांना पांगवण्यासाठी लाठीचार्ज करावा लागला होता. तर दुसरीकडे विद्यार्थ्यांनी परीक्षा ऑनलाईन व्हाव्यात म्हणून आंदोलन केली.
महत्वाच्या बातम्या :
- IPL AUCTION 2022: वीर झारा ऑक्शनमध्ये पुन्हा आमने सामने; मात्र यावेळी बाजी झाराची
- राज्यातील भौगोलिक स्थिती पाहता आता ऑनलाईनकडून ऑफलाईनकडे जावंच लागेल- उदय सामंत
- ‘हातपाय तोडले तरी लढत राहणार’; किरीट सोमय्यांचा इशारा
- “तुमच्या राज्यात जगायची इच्छा राहिली नाही म्हणत अन्ना हजारेंनी आमरण उपोषण पुढे ढकलले”
- रणदीप सुरजेवाला यांची बँक घोटाळ्यावरून भाजप वर टीका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
