🕒 1 min read
बंगळूरू: वेस्ट इंडिजचा खेळाडू ओडीन स्मिथवर (odean smith) IPL-2022 मेगा लिलावात पैशांचा वर्षाव झाला. बेस प्राईस मध्ये ५० लाख किंमत असताना पंजाब संघाने त्याला सहा कोटी रुपयांना विकत घेतले आहे. लखनऊ सुपर जायंट्स आणि सनरायझर्स हैदराबादने या खेळाडूसाठी बोली लावली होती. मात्र पंजाबने बाजी मारली.
दरम्यान ओडीन स्मिथ पहिल्यांदाच आयपीएलमध्ये खेळणार आहे. त्याने २०१८ मध्ये वेस्ट इंडिजसाठी टी-२० पदार्पण केले परंतु त्याला वनडे पदार्पण करण्यासाठी थोडा वेळ लागला. त्याने यावर्षी जानेवारीत आयर्लंडविरुद्ध वनडे पदार्पण केले. आता त्याची वर्णी थेट आयपीएलमध्ये लागली आहे.
भारताविरुद्धच्या वनडे मालिकेत स्मिथने विराट कोहली आणि शिखर धवनसारख्या फलंदाजांना बाद केले होते. दुसऱ्या सामन्यात किरन पोलार्डला दुखापत झाल्यानंतर त्याला संधी मिळाली आणि या सामन्यात ऋषभ पंत आणि विराट कोहली एकाच षटकात बाद झाले. त्याच्या या कामगिरीनंतर तो चांगलाच चमकला होता.
महत्वाच्या बातम्या:
- “हिंदुस्थानी भाऊला आपणच मोठं करतो’, उदय सामंत यांचे मोठे वक्तव्य
- रणदीप सुरजेवाला यांची बँक घोटाळ्यावरून भाजपवर टीका
- ‘हातपाय तोडले तरी लढत राहणार’; किरीट सोमय्यांचा इशारा
- राज्यातील भौगोलिक स्थिती पाहता आता ऑनलाईनकडून ऑफलाईनकडे जावंच लागेल- उदय सामंत
- IPL AUCTION 2022: वीर झारा ऑक्शनमध्ये पुन्हा आमने सामने; मात्र यावेळी बाजी झाराची
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
