🕒 1 min read
मुंबई : देशभरासह राज्यातील करोनाच्या दुसऱ्या लाटेचे संकट आता हळूहळू कमी होत आहे. अनलॉक प्रक्रियेला सुरूवात होऊन निर्बंधामध्ये सूट देण्यात आलीये. कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन, याबाबत निर्णय घेतले जात आहेत. राज्यात मागील काही दिवसांपासून सातत्याने दररोज आढळणाऱ्या बाधितांपेक्षा कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या जास्त आढळत आहे. राज्याचा रिकव्हरी रेटही वाढताना दिसत आहे.
राज्यात आज 10,066 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 11,032 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 57,53,290 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 1,21,859 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 95.93% झाले आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. आज नव्या कोरोना बाधितांच्या आकड्यात वाढ झाली आहे. तर, कोरोनाच्या नव्या डेल्टा प्लस व्हेरिएंटचे संकट घोंगावू लागलं आहे.
राज्यात आज 10,066 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 11,032 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 57,53,290 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 1,21,859 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 95.93% झाले आहे. pic.twitter.com/ms3nqw2jP9
— Rajesh Tope (@rajeshtope11) June 23, 2021
डेल्टा प्लस व्हेरिएंटचा राज्यात शिरकाव, आरोग्यमंत्री म्हणतात…
कोरोनाच्या तिसरा लाटेचा धोका ज्या डेल्टा प्लस व्हेरिएंटमुळे आहे त्याचा काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रात शिरकाव झाला आहे. कोरोनाच्या ‘डेल्टा व्हेरिएंट’ने भारतात बरीच हानी केली आता डेल्टा प्लस व्हेरिएंट चिंतेचे कारण बनला आहे, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी म्हटले. राज्यात सात जिल्ह्यांमध्ये या व्हेरिएंटचे रुग्ण आढळले आहेत.
याच पार्श्वभूमीवर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे माध्यमांशी बोलत होते. डेल्टा प्लस विषाणूचा संसर्ग झालेले रुग्ण अधिक गंभीर होतात मात्र, तरीही घाबरण्याचे कारण नाही आहे. ज्या ठिकाणी डेल्टा प्लस विषाणूचे रुग्ण आढळून आले आहेत तेथे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग सांगितलं आहे, असं राजेश टोपे म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- पवारांच्या दिल्लीतील खलबतांनंतर आता राऊतांनी घेतली भेट ! ट्विटवरून दिली ‘ही’ माहिती
- नातेवाईकाच्या लग्नासाठी आला अन् जलाशयात पोहण्याच्या मोहापायी बुडाला!
- मराठवाड्याची पाणी टंचाई दूर करण्यासाठी फडणवीस सरकारच्या प्रकल्पाबाबत मोठा निर्णय !
- इंडिगोची औरंगाबाद ते दिल्ली, हैदराबाद विमान सेवा ५ जुलैपासून
- बॉलिवूडमधील नामांकित फॅशन डिझायनर्सवर EDकडून कारवाई होण्याची शक्यता
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
