Share

चेन्नई सुपर किंग्सची नवीन जर्सी! धोनीने केली लाँच

Published On: 

पुणे : आयपीएल मधील चेन्नई सुपर किंग्सच्या संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने नुकताच आयपीएलच्या पुर्वतयारीसाठी पुण्यात दाखल झाला आहे. पुण्यात दाखल झाल्यानंतर कर्णधार महेंद्रसिंह धोनीने चेन्नई सुपर किंग्सची नवीन जर्सीचे अनावरण केले आहे. चेन्नई सुपर किंग्सने धोनीचा हा व्हिडीओ सोशल मीडीयावर पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार धोनीने चेन्नईच्या संघाची नवीन जर्सीचे अनावरन केले आहे. चेन्नईच्या या नवीन जर्सीच्या माध्यमातून भारतीय सेनादलालाही मानवंदना देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या जर्सीच्या खांद्याच्या डिझाईनमध्ये बदल करण्यात आला आहे. भारतीय सेना दलाच्या गणवेशाप्रमाणे जर्सीच्या खांद्याला रंग देण्यात आला आहे.

धोनीचे वय पाहता यंदाचा आयपीएल हंगाम त्याच्यासाठी शेवटचा हंगाम ठरु शकतो, असे जाणकारांचे मत आहे. मागील वर्षी झालेल्या पराभवानंतर धोनी आयपीएलमधून निवृत्ती घेईल असे सर्वाना वाटत होते. कारण मागील वर्षी आयपीएल सुरु होण्यापुर्वी धोनीने अंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. त्याचवेळी आयपीएलचा मोसम संपताच धोनी आयपीएलमधूनही निवृत्ती जाहीर करेल असे सर्वाना वाटत होते. यंदाच्या मोसमात चेन्नईचा संघ काय कमाल करतो, याकडे सर्वांचे लक्ष असेल.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!