पुणे : भारताचा माजी कर्णधार व प्रशिक्षक अनिल कुंबळे आणि टीम इंडियाचा सध्याचा कर्णधार विराट कोहली पुन्हा आमने-सामने आले आहेत. क्रिकेटच्या मैदानातील अंपायर्स कॉलला काही स्तरांतून विरोध करण्यात आल्यानंतरही अनिल कुंबळे सदस्य असलेल्या आयसीसीच्या क्रिकेट समितीने ‘अंपायर्स कॉल’ला सपोर्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. विराट कोहलीने ‘अंपायर्स कॉल’ला विरोध केला होता. याआधी विराट कोहली व अनिल कुंबळे यांच्यामध्ये मतभेद झाले होते. त्यामुळे अनिल कुंबळे यांना टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदावरून माघार घ्यावी लागली होती.
आयसीसीच्या क्रिकेट समितीची मार्च महिन्यात बैठक पार पडली होती. या नियमाचे महत्त्व खेळाडू व क्रिकेटप्रेमींना चांगल्या पद्धतीने समजून सांगण्याची गरज आहे. बॉल ट्रकिंग टेक्नॉलॉजी प्रत्येक वेळी 100 टक्के यशस्वी ठरत नाही. त्यामुळे ‘अंपायर्स कॉल’ हा नियम कायम ठेवायला हवा. असा सूर या बैठकीमधून निघाला होता.
क्रिकेटचे नियम बनवणारी ‘मेरीलबोन क्रिकेट क्लब’ (एमसीसी) या संस्थेतील सदस्यांमध्येही या नियमावरून दोन गट तयार झाले आहेत. काहींनी या नियमाला थम्स अप दाखवला आहे. तर काहींना वाटते की, आऊट व नॉट आऊट असा साधा नियम तयार करायला हवा. किचकट नियमाची गरज नाहीए.
आयसीसीच्या समितीत अनिल कुंबळे यांच्यासह राहुल द्रविड, ऍण्ड्रय़ू स्ट्रॉस, महेला जयवर्धने, शॉन पोलॉक या क्रिकेटपटूंसह रेफ्री रंजन मदुगले, पंच रिचर्ड इलिंगवर्थ व मिकी आर्थर यांचाही समावेश आहे. या नियमाबाबत या समितीने सामनाधिकारी, ब्रॉडकास्टर्स, हॉक आय व बॉल ट्रकिंग टेक्नॉलॉजीच्या सप्लायर यांच्यासोबत चर्चा केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- अलर्ट! औरंगाबादेत कोरोनामुळे २३ जणांचा मृत्यू, १७०२ नव्या कोरोनाबाधितांची भर
- जमिनीची सातबारामध्ये नोंद करण्यासाठी ३ हजारांची लाच; तलाठी एसीबीच्या जाळ्यात
- मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदाबाबत चमत्कार करणार असल्याचा झांबड यांचा गौप्यस्फोट
- सर्व संशोधक विद्यार्थ्यांना ‘गाइड’ मिळणार! व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत निर्णय
- बॉलीवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट अमिर खानला कोरोनाची लागन


