मुंबई : येत्या ९ एप्रिलपासून आयपीएल १४ चा बिगुल वाजणार आहे. नेहमीप्रमाणे यंदाही विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली आरसीबीचा संघ आयपीएलच्या जेतेपदासाठी सज्ज आहे. मात्र यंदाच्या आयपीएलआधी संघाच्या एका खेळाडूने खास कारणासाठी सुट्टी मागिलती होती. आणि संघानेही ती सुट्टी मान्य केली आहे. त्यामुळे उद्घाटनाच्या लढतीत आरसीबीचा हा खेळाडू संघात नसेल.
यंदाच्या आयपीएलचा पहिला सामना हा विराट कोहलीच्या आरसीबी आणि रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्स संघादरम्यान होणार आहे. मात्र आरसीबीचा प्रमुख खेळाडू फिरकीपटू अॅडम झाम्पा हा या लढतीत खेळू शकणार नाही. कारण यादरम्यान अॅडम झाम्पाचे लग्न आहे. अॅडम झाम्पाच्या लग्नासाठी आरसीबीने त्याला खास सुट्टी देखील दिलेली आहे. अॅडम झाम्पा हा ऑस्ट्रेलीयाचा खेळाडू आहे.
आयपीएलच्या सलामीच्या सामन्यात अॅडम झाम्पा खेळु शकणार नाही याची माहिती आरसीबीच्या संघाचे संचालक माइक हेसन यांनी ट्विटरवर एक व्हिडीओ पोस्ट करुन दिली आहे. ऑस्ट्रेलियाकडून खेळताना झाम्माने दमदार कामगिरी करत विराट कोहलीलाही बाद केले होते. झाम्पाने १७३ ट्वेन्टी-२० सामन्यात २०० बळी मिळवले आहेत. गेल्यावर्षी युएइमध्ये झालेल्या आयपीएलमध्ये झाम्पाला तीन सामन्यांमध्ये खेळण्याची संधी मिळाली होती.
महत्वाच्या बातम्या
- एकदिवसीय सामन्यांत शिखर धवन सहाव्यांदा नर्व्हस नाइंटीचा बळी
- आयपीएलसाठी सुरेश रैना सज्ज; मुंबईत पोहोचल्यावर केला फोटो पोस्ट
- मुंबई ते दिल्ली प्रवास आता केवळ १२ तासांत शक्य होणार नितीन गडकरींचा मेगा प्लान
- कुंबळे-कोहली पुन्हा आमने-सामने
- ‘मोदी सरकारने लोकशाही आणि स्वातंत्र्याचा गळा घोटायचा हे ठरवूनच टाकले आहे’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

