Share

मुंबई ते दिल्ली प्रवास आता केवळ १२ तासांत शक्य होणार नितीन गडकरींचा मेगा प्लान

Published On: 

नवी दिल्ली : केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी पीएचडी चेंबर ऑफ कॉमर्सने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात मेगा प्लान आखत असल्याची माहिती दिली आहे. केंद्र सरकार आता ग्रीन एक्सप्रेसकडे मोर्चा वळवत आहे. यावेळी अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ग्रीन एक्सप्रेस हायवेच्या बांधकामावर सरकार ७ लाख कोटी रुपये खर्च करणार आहे. विशेष म्हणजे या योजनेनुसार देशातील मोठी शहरं राजधानी आता दिल्लीला जोडली जाणार आहेत. त्यामध्ये, मुंबई-दिल्ली या द्रुतगती महामार्गाचाही समावेश आहे.

पुढील वर्षभरात दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्ग पूर्ण होणार असून, या प्रकल्पासाठी एक लाख कोटी रुपये खर्च आला आहे. तसेच दिल्ली-मेरठ एक्सप्रेस वे चे उद्घाटन एक ते दोन महिन्यांत होईल, अशी माहिती गडकरी यांनी दिली. दिल्ली-अमृतसर-कटरा प्रकल्पाचे काम दोन ते तीन महिन्यांत सुरू होईल. दिल्ली-फरीदाबाद-सोहना एक्सप्रेस महामार्ग आणि अहमदाबाद-ढोलेरा महामार्ग प्रकल्प सादर करण्यात आला आहे, असे गडकरी यांनी यावेळी बोलताना नमूद केले.

ग्रीन हायवेच्या बांधकामामुळे देशातील वायू प्रदूषण कमी होण्यास, रहदारी सुलभ होण्यास आणि लॉजिस्टिक्स तसेच वाहतुकीचा खर्च देखील कमी होईल, असा विश्वास गडकरी यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

या मार्गामुळे मुंबई ते दिल्ली प्रवास कारने केवळ १२ तासांत शक्य होणार आहे. सध्या हा प्रवास पूर्ण करण्यासाठी तब्बल ४० तास लागतात. या योजनेंतर्गत पहिल्या टप्प्यात ८ पदरी आणि दुसऱ्या टप्प्यात १२ पदरी रस्ते महामार्ग निर्माण होणार आहे. याठिकाणी एक इलेक्ट्रीकल महामार्ग भोगदाही बनविण्यात येणार आहे. या मार्गावरील १३०० किमी काम ६० टक्क्यापर्यंत पूर्ण झाल्याचंही गडकरी यांनी सांगितलं. यामुळे हा मार्ग अनेक नागिरकांना फायदेशीर ठरणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!