मुंबई : भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैना हा यंदाच्या आयपीएलसाठी सज्ज झाला आहे. नुकताच तो तयारीसाठी मुंबईत पोहोचला त्यावेळी त्याने एक फोटो पोस्ट करत याची माहिती दिली. मागील वर्षी सुरेश रैना चेन्नई सुपर किंग्सच्या संघाला सोडून भारतात परत आला होता. यांनतर रैनाच्या संघातील सहभागाविषयी भरपुर चर्चा सुरु होत्या.
आयपीएलच्या नव्या पर्वासाठी सुरेश रैना मुंबईत पोहोचला आहे. आता तो चेन्नई सुपर किंग्सच्या टीममध्ये दाखल होणार आहे. कोरोना संसर्गामुळे गेल्यावर्षीची आयपीएल स्पर्धा ही युएईमध्ये पार पडली होती. त्यावेळी चेन्नईच्या संघातील काही सदस्य कोरोना पॉझीटीव्ह आढळले होते. त्यांनतर वैयक्तीक कारणास्तव रैनाने आयपीएल सोडून परत भारतात परतण्याचा निर्णय घेतला होता. यामुळे संघाचे मालक एन. श्रीनिवासन आणि सुरेश रैना यांच्यात वाद झाला होता.
यावादामुळे रैनाला चेन्नईच्या संघात पुन्हा स्थान मिळणार नाही असे भाकीत वर्तवले जात होते. मात्र यंदाच्या आयपीएल लीलावादरम्यान रैनाला चेन्नईच्या संघाने कायम ठेवले आणि सर्व चर्चाना पुर्णविराम दिला. मागील वर्षी चेन्नईच्या संघाची कामगीरी प्रथमच चांगली नव्हती झाली. आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच चेन्नईचा संघ सर्वात पहिले स्पर्धेच्या बाहेर पडला होता. तसेच गुणतालीकेतही तो सर्वात खाली होता. यंदा चेन्नई जोरदार पुनरागमन करेल अशी चाहत्यांना आशा आहे.
महत्वाच्या बातम्या
- एकदिवसीय सामन्यांत शिखर धवन सहाव्यांदा नर्व्हस नाइंटीचा बळी
- गुजरात एटीएसची पुण्यात कारवाई; 2006 बॉम्बस्फोट प्रकरणी मोहसीन पूनावालाच्या मुसक्या आवळल्या
- मुंबई ते दिल्ली प्रवास आता केवळ १२ तासांत शक्य होणार नितीन गडकरींचा मेगा प्लान
- कुंबळे-कोहली पुन्हा आमने-सामने
- ‘मोदी सरकारने लोकशाही आणि स्वातंत्र्याचा गळा घोटायचा हे ठरवूनच टाकले आहे’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

