दिल्ली : आयपीएलमध्ये बुधवारी झालेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने सनरायझर्स हैदराबाद संघाला ७ गडी राखुन पराभुत केले. हैदराबादने दिलेले १७२ धावांचे लक्ष्य चेन्नईने केवळ ३ गडी गमावक एकोणीसाव्या षटकात पुर्ण केले. चेन्नई सुपर किंग्सचा हा स्पर्धेतील सलग पाचवा विजय आहे. धडाकेबाज अर्धशतक करणाऱ्या ऋुतूराज गायकवाडला(७५) सामनावीराच्या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.
नाणेफेक जिंकल्यानंतर हैदराबाद संघाची सुरुवात चांगली झाली नाही. अवघ्या सात धावावर जॉनी बेअरस्टोला सॅम करनने बाद करत चेन्नईला पहिला बळी मिळवुन दिला. मात्र यानंतर कर्णधार डेव्हिड वॉर्नर(५७) आणि मनीष पांडे(६१) दोघांनी शतकी भागीदारी करत हैदराबादचा डाव सावरला. मात्र दोघानाही चेन्नईच्या गोलंदाजानी जखडुन ठेवले होते. वॉर्नर आणि पांडे बाद झाल्यानंतर केन विल्यमसन(२६) आणि केदार जाधव(१२) यांनी आखेरच्या षटकात फटकेबाजी केली. निर्धारित २० षटकात ३ गडी गमावत हैदराबादने १७१ धावांची मजल मारली. मनीष पांडेने हैदराबादकडून सर्वाधिक ४६ चेंडुत ५ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने ६१ धावा केल्या.
Match 23. It's all over! Chennai Super Kings won by 7 wickets https://t.co/w7vUSl6314 #CSKvSRH #VIVOIPL #IPL2021
— IndianPremierLeague (@IPL) April 28, 2021
हैदराबादने दिलेल्या १७१ धावांचा पाठलाग करण्यासाठी फलंदाजीसाठी उतरलेल्या चेन्नई कडुन सलामीवीर फाफ डु प्लेसिस(५६) आणि ऋुतुराज गायकवाड(७५) यांनी शतकी सलामी देत हैदराबादच्या अव्हानातील हवाच काढुन घेतली. हैदराबादला पहिला बळी हा १२८ धावावर मीळाला. तर मोईन अली(१५) आणि डु प्लेसीस दोघे लागोपाठ बाद झाल्यनंतर सुरेश रैना आणि रविंद्र जडेजा यांनी अधिक पडझड न होऊ देता १९व्या षटकात विजय संपादन केला. चेन्नईकडुन सलामीवीर ऋुतुराज गायकवाडने सर्वाधिक ४४ चेंडुत १२ चौकारासह ७५ धावांची खेळी केली. तर राशिद खानने हैदराबादकडून ३ गडी बाद केले.
महत्वाच्या बातम्या
- ऑक्सिजन अभावी दौंडमध्ये ४ रुणांचा मृत्यू, नातेवाईकांचा हॉस्पिटलवर आरोप
- अखेर दीपाली चव्हाण प्रकरणी निलंबित वनसंरक्षक एम एस रेड्डीला अटक
- ‘दिलेला शब्द पाळा, केंद्रावर जबाबदारी ढकलू नका’ पंकजांनी ठाकरे सरकारला सुनावले
- राज्यात दिवसभरात ६३ हजार ३०९ रुग्णांची वाढ, ९८५ जणांचा मृत्यू
- ‘या’ आरोग्य केंद्रात लस उपलब्ध करुन देण्याची मागणी


