🕒 1 min read
मुंबई : मुंबईमधील वरळी येथील ब्लू सीज या हॉटेलमध्ये ‘धर्मवीर : मुक्काम पोस्ट ठाणे’ या चित्रपटाच्या म्युझिक लॉन्चचा कार्यक्रम पार पडला. राज्याचे सर्वाजनिक बांधकाम, नगरविकास मंत्री तसेच ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये पार पडलेल्या कार्यक्रमामध्ये अभिनेता प्रसाद ओक यांच्या पाया पडले.
पाया पडण्याचं निमित्त होतं ‘धर्मवीर : मुक्काम पोस्ट ठाणे’ या चित्रपटाच्या म्युझिक लॉन्चचं. कट्टर शिवसैनिक म्हणून ओळख निर्माण करणारे दिवंगत नेते धर्मवीर आनंद दिघे यांचा जीवनप्रवास दाखवणाऱ्या या चित्रपटाचं म्युझिक काल गुरुवारी मुंबईत लॉन्च करण्यात आले. आनंद दिघे यांच्या व्यक्तीमत्वामधील एक सामान्य व्यक्ती, शिवसेना कार्यकर्ता ते ठाण्यातील शिवसेनेचा सर्वात प्रमुख नेता, असा प्रवास या चित्रपटाच्या माध्यमातून पहायला मिळणार असल्याचे बोलले जात आहे.
‘धर्मवीर : मुक्काम पोस्ट ठाणे’ या चित्रपटामध्ये अभिनेता प्रसाद ओकने आनंद दिघेंची भूमिका साकारली आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये आनंद दिघेंसारखं फक्त दिसणं नाही तर त्यांच्या छोट्यामोठ्या सवयी आणि स्टाइलने प्रसाद ओक सर्वांची मनं जिंकली आहेत. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा ट्रेलर समोर आल्यानंतर अनेकांनी प्रसाद ओकच्या या लूकचं कौतुक केलं होतं. विशेष म्हणजेच प्रसादचा हा लूक पाहून आनंद दिघेंना राजकीय गुरु मानणारे एकनाथ शिंदेही भारावून गेल्याचं पहायला मिळालं. त्यामुळेच आनंद दिघेंप्रमाणे खांद्यावर रुमाल टाकून प्रसाद ओक जेव्हा आनंद दिघेंच्या लूकमध्येच म्युझिक लॉन्चसाठी मंचावर पोहोचले तेव्हा एकनाथ शिंदे वाकून प्रसादच्या पाया पडले.
महत्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
