Share

इंडिज-बांगलादेश संघांत आज होणार लढत; आव्हान टिकविण्यासाठी विजय अनिवार्य

Published On: 

🕒 1 min read

शारजा : वेस्ट इंडिज आणि बांगलादेश या उभयी संघांत आज सामना होणार आहे. विश्वचषक स्पर्धेत आव्हान टिकविण्यासाठी आज हे दोन्ही संघ झुंजणार आहेत. सलग दोन सामन्यांमधील पराभवामुळे ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या ‘अव्वल-१२’ फेरीत त्यांना झुंजावे लागणार आहे.

आजचा सामना शारजा स्टेडीयम येथे होणार आहे. दरम्यान इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या लढतीत विंडीजचा डाव ५५ धावांत कोसळला. दुसऱ्या लढतीत लेंडल सिमन्सने ३५ चेंडूंत फक्त १६ धावा केल्या. त्यामुळे सिमन्सऐवजी रोस्टन चेसला आजच्या सामन्यात संधी मिळू शकते.

तर बांगलादेशकडे मोहम्मद नैम, लिटन दास, शाकिब अल हसन, महमुदुल्ला आणि मुशफिकूर रहिम यांच्यासारखे सतार खेळाडू आहेत. श्रीलंकेविरुद्ध नैम आणि रहिमने अर्धशतके झळकावत संघाला भरभक्कम धावसंख्या उभारून दिली, परंतु गोलंदाजांनी सामना गमावला. दरम्यान आज दोन्ही संघांना अस्तित्वासाठी झुंज द्यावी लागणार आहे. दुपारी ३: ३० वाजता हा सामना रंगणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!