मुंबई : वेदांता ग्रुप व फोक्सकॉनचा सेमीकंडक्टर चिप निर्मितीचा प्रकल्प गुजरातला गेला आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात याचे पडसाद उमटलेले पाहण्यास मिळाले. यावरून राज्यातील अनेक रायकीय नेत्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आमदार कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी याविषयी एक वक्तव्य केलं आहे.
काय म्हणाले रोहित पवार ?
फॉक्सकॉन- वेदांताचा सेमीकंडक्टर बनवण्याचा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेला हे चांगले झाले नाही. कारण या प्रकल्पामुळे राज्यातील दीड लाख लोकांना नोकरी मिळाली असती, त्यामुळे हा प्रकल्प गुजरातला गेल्यामुळे तुरूणांच्या रोजगाराची संधी हुकली असल्याचं रोहित पवार यांनी म्हटलं आहे. रोहित पवार यांनी मुंबईमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.
रोहित पवार यांनी सांगितले की, महाविकास आघाडी असताना हा प्रोजेक्ट आपल्याकडे यावा यासाठी सरकाने प्रयत्न केला होता. मात्र सरकारने असा प्रयत्न केला होता की, आमच्याकडून हा प्रोजेक्ट व्हावा. मात्र असे कळत आहे की, आता तो प्रोजेक्ट गुजरातला गेलेला आहे ही आश्चर्याची गोष्ट आहे. पुढे ते असंही म्हणाले की, 1 लाख 58 हजार कोटींचा हा प्रोजेक्ट गुजरातला जाऊ नये यासंदर्भात मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलणार आहे.
तसेच रोहित पवार यांनी पुढे असंही सांगितले की, आयएफसी सेंटर हे आधी मुंबईला होतं. परंतू आता ते गुजरातला हलवण्यात आलं आहे. त्यामुळेही राज्यातील दोन लाख तरूणांना नोकरी मिळाली असती. त्यामुळे हाही प्रकल्प आपल्याला पुन्हा महाराष्ट्रात आणावा लागणार आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Raj Thackeray | 1 लाख 58 हजार कोटींचा प्रकल्प गुजरातला; राज ठाकरेंची प्रतिक्रिया, म्हणाले…
- Eknath Shinde । पुणे-नाशिक रेल्वे मार्गासह अन्य प्रकल्पांना गती द्या; मुख्यमंत्र्यांचे ‘महारेल’ला निर्देश
- Shambhuraj Desai | सातारा जिल्ह्यातील लम्पी प्रादुर्भावाचा मंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला आढावा
- Chandrakant Patil | राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांची संख्या पाच लाख होणार – चंद्रकांत पाटील
- Uday Samant। 1. 54 लाख कोटींची प्रक्लप गुजरातला; उद्योगमंत्री सामंत म्हणतात माहिती घेतोय


