Share

Balasaheb Thorat | “रोजगार देणारे प्रकल्प गुजरातला गेल्यावर महाराष्ट्रातील तरूणांनी फक्त दंही-हंड्याच फोडायच्या का?”

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : वेदांता ग्रुप व फोक्सकॉनचा सेमीकंडक्टर चिप निर्मितीचा प्रकल्प गुजरातला गेला आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात याचे पडसाद उमटलेले पाहण्यास मिळाले. यावरून राज्यातील अनेक रायकीय नेत्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. अशातच काँग्रेस विधिमंडळाचे पक्षनेते बाळासाहेब थोरात यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

बाळासाहेब थोरात यांचे वक्तव्य-

महाराष्ट्र हे गुंतवणुकदारांच्या पसंदीचे पहिल्या क्रमांकाचे राज्य आहे. महाविकास आघाडीच्या सरकारनेही अडीच वर्षांच्या काळात मोठी गुंतवणूक राज्यात आणली व त्यातून राज्यातील लाखो तरुणांच्या हाताला काम दिले. मात्र महाविकास आघाडीचे सरकार जाताच अडीच महिन्यात असे काय झाले की, महाराष्ट्रात 1 लाख 58 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणारा फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेला. महाविकास आघाडी सरकारने या प्रकल्पावर जवळपास 90 टक्के चर्चाही केली होती. त्यामुळे यामागचे नेमके गौडबंगाल काय हे जनतेला कळाले पाहिजे, असं बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे. बाळासाहेब थोरात यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री देवदर्शनात व्यस्त-

पुढे ते असंही म्हणाले की, गुजरातला गेलेला प्रकल्प राज्यातील 1 लाख लोकांना रोजगार निर्माण करून देणारा होता. एवढा मोठा प्रकल्प गुजरातला गेल्याने महाराष्ट्रातील तरुणांनी काय फक्त दहिहंड्याच फोडत बसायचे काय?, असा सवाल बाळासाहेब थोरात यांनी राज्य सरकारला केला आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सत्कार सोहळे करण्यात व देवदर्शनात व्यस्त आहेत. यासगळ्यातून त्यांना राज्य कारभार करण्यास वेळ मिळत नसावा पण थोडे लक्ष राज्याच्या कामकाजात दिले असते तर एवढा मोठा प्रकल्प महाराष्ट्राच्या हातून गेला नसता.

मुंबई व महाराष्ट्राचे महत्व कमी करण्यासाठी भारतीय जनता पक्ष व केंद्रातील भाजप सरकार सातत्याने प्रयत्न करत आले आहेत. तसेच, हा प्रकल्प गुजरातमध्ये जात असल्याची कोणतीच माहिती राज्य सरकारला समजली नाही का?. त्याचप्रमाणे हा प्रकल्प महाराष्ट्रातच रहावा यासाठी शिंदे फडणवीस सरकारने काय प्रयत्न केले?, असे अनेक प्रश्न याठिकाणी थोरात यांनी उपस्थित केले आहेत.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!