🕒 1 min read
Shivsena। मुंबई : गेल्या काही दिवसांपासून दसरा मेळाव्यावरून राज्याचं राजकीय वातावरण तापलं आहे. दसरा मेळाव्यात शिवसेना आणि एकनाथ शिंदे गट दोन्ही गट आपली ताकद दाखवण्याच्या तयारीत आहेत. यावेळी दोन शिवसेना गट तयार झाल्याने दसरा मेळावा कोण घेणार? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. दोन्ही गट मूळ शिवसेनेचेच असल्याचा दावा करत आहेत. तर शिवसैनिक आजही आपल्या पाठिशी आहेत, असा संदेश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दसरा मेळाव्यातून द्यायचा आहे, मात्र त्याच्या परवानगीबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. यानंतर आता सूत्रांकडून मोठी माहिती समोर आली आहे. एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा आपला दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच होणार असा दावा केला आहे.
दसरा मेळाव्याबाबत शिंदे गटाची बैठक
याआधी शिंदे गटाचा दसरा मेळावा बीकेसी मैदानावर होणार असल्याची माहिती समोर येत होती. मात्र, हा दसरा दसरा मेळावा शिवतीर्थावरच व्हायला हवा अशी भूमिका एकनाथ शिंदे यांनी मांडली आहे. यामुळे शिवाजी पार्कवरच शिंदे गटाचा दसरा मेळावा होणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. शिंदे यांच्या उपस्थितीत दसरा मेळावा कुठे घ्यायचा यावर शिंदे गटाची बैठक पार पडली. या बैठकीत दसरा मेळाव्याच्या आयोजनाबाबत चर्चा झाली असून शिवाजी पार्कवरच शिंदे गटाचा दसरा मेळावा होणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. दसरा मेळावा शिवतीर्थावर जोरात साजरा होणार असे देखील एकनाथ शिंदेंनी या बैठकीत म्हटले आहे. या बैठकीत शिंदे यांनी दसरा मेळावा शिवाजी पार्कवर होण्यार असल्याची घोषणा केल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.
याआधी शिंदे गटाचा दसरा मेळावा बीकेसी मैदानावर होणार?
शिवसेना व शिंदे गट यापैकी दसरा मेळाव्यासाठी नेमकं शिवाजी पार्क कुणाला मिळतं याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय. अशातच आता एकनाथ शिंदे गटाचा दसरा मेळावा शिवाजी पार्कऐवजी बीकेसीतील एमएमआरडीएच्या मैदानावर घेतला जाणार की काय, अशी चर्चा रंगली आहे. शिवाजी पार्कनंतर आता शिंदे गटाकडून बीकेसीतील मैदानासाठीही अर्ज करण्यात आला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे दसरा मेळाव्याबाबत पालिकेच्या प्रशासकांकडून नेमकी परवानगी कुणाला दिली जाते, याची उत्सुकता अधिक ताणली गेली आहे.
शिवाजी पार्कसाठी देखील शिंदे गटाने अर्ज केला होता
याअगोदर मोठी माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटानेही याच जागी दसरा मेळावा व्हावा, यासाठीचे परवानगी मागणारे पत्र मुंबई महापालिकेला पाठवले असल्याची माहिती आहे. मुंबई महापालिकेकडून आता परवानगी कुणाला मिळणार, यावर सगळं ठरणार असल्याचे सांगण्यात येत आहे. एकनाथ शिंदे गटातील आमदारांना दसऱ्याला त्यांनी मुंबईतच राहावे, असे सांगण्यात आले आहे. अर्ज केला आहे, हे नक्की. शिवसेनेचा दरवर्षी ज्या प्रमाणे दसरा मेळावा होतो, त्याप्रमाणे परवानगी मागिती आहे, असे शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी सांगितले. यानंतर यावर आता शिवसेना मुखपत्र सामानातून शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल चढवला आहे.
महत्वाच्या बातम्याः
- Rohit Pawar | “…म्हणून तरुणांच्या रोजगाराची संधी हुकली”; रोहित पवार
- Raj Thackeray | 1 लाख 58 हजार कोटींचा प्रकल्प गुजरातला; राज ठाकरेंची प्रतिक्रिया, म्हणाले…
- Eknath Shinde । पुणे-नाशिक रेल्वे मार्गासह अन्य प्रकल्पांना गती द्या; मुख्यमंत्र्यांचे ‘महारेल’ला निर्देश
- Shambhuraj Desai | सातारा जिल्ह्यातील लम्पी प्रादुर्भावाचा मंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला आढावा
- Chandrakant Patil | राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांची संख्या पाच लाख होणार – चंद्रकांत पाटील
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
