मुंबई : कर्नाटकासह संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून असलेल्या बेळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. बेळगाव महापालिकेवर महाराष्ट्र एकीकरण समितीचा भगवा फडकविण्याचे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी बोलून दाखवलेलं स्वप्न मात्र भंग पावल्याचं स्पष्ट दिसत आहे.
बेळगाव महापालिका निवडणुकीत एकहाती वर्चस्व मिळवल्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भाष्य केले आहे. दरम्यान सध्या सोशल मीडियावर भाजपकडून ट्रेंड केलं जात आहे की बेळगाव तो झांकी है, मुंबई अभी बाकी है, याबाबत पाटील यांना एका वृत्तवाहिनीने विचारलं असता, ‘बेळगाव झांकी आहे की नाही माहिती नाही, पण मुंबई बाकी आहे’ हे तर नक्कीच आहे आणि ती सोडणार नाहीत. अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
तसेच यावर बोलताना ते म्हणाले कि, हैदराबादच्या वेळेलाही आम्ही म्हटलं होतं. दोन का एक नगरसेवकावरुन थेट आम्ही 51 वर गेलो. तेव्हा आम्ही म्हणलं की ज्या स्टाईलने आम्ही हैदराबाद लढलो, त्याच स्टाईलने मुंबई लढणार, असं थेट आव्हानच पाटील यांनी शिवसेनेला दिलं आहे. तसंच बेळगावात भाजपचे जे नगरसेवक निवडून आले आहेत, त्यात निम्म्यापेक्षा जास्त मराठी भाषिकच असल्याचं पाटील यांनी सांगितले आहे.
- आंदोलनाचं शस्त्र खाली ठेवलेलं नाही; मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतरही शेट्टींचा एल्गार कायम
- ‘आता मी कोणासाठी जगणार…’; सिद्धार्थच्या आईने व्यक्त केल्या वेदना
- बिंदूसरासह माजलगाव धरण शंभर टक्के भरले, ११ दरवाजे उघडले
- अजिंक्य रहाणे शून्यावर बाद; नेटकरी म्हणाले, ‘जारवोप्रमाणे रहाणेला ओढून बाहेर काढा’
- खेड : तरसाचा दोघांवर हल्ला, तरुणाने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे वृद्धाचा जीव वाचला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

