Share

‘राऊतांच्या ‘त्या’ वक्तव्यावरून चंद्रकांत पाटलांचा टोला म्हणाले..’

Published On: 

मुंबई: दादरा-नगर हवेलीमध्ये शिवसेनेने विजय मिळविला. राज्याबाहेर हा शिवसेनेचा पहिलाच विजय आहे. त्यामुळे आता शिवसेनेसाठी दिल्ली दूर नाही, असं संजय राऊत म्हणाले होते. आता यावरच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया देत राऊत यांना चांगलाच टोला लगावला आहे.

डेलकर कोण आहेत? ते आधीपासून शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत का? मिळालेली मतं शिवसेनेची आहेत का? असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. दादरा नगर हवेलीमध्ये शिवसेनेला विजय मिळाला. पण, डेलकर शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत का? ते सातवेळा वेगवेगळ्या चिन्हावर निवडून आले आहेत. त्यावरून उद्धव ठाकरे दिल्लीच्या राजकारणात जाणार हे दावे हास्यास्पद आहेत, असा टोलाही चंद्रकांत पाटलांनी लगावला आहे.

दरम्यान महाराष्ट्र सरकारने इंधनावरील कर कमी करायला पाहिजे. मात्र, त्यांनी तो दर कमी केला नाही. शेवटी केंद्राने दर कमी केला होता. कोरोनापासून इंधनापर्यंत सर्व गोष्टींकडे केंद्राकडे बोट दाखवतात. राज्य सरकार पेट्रोल -डिझेलबाबत सकारात्मक भूमिका घेणार नाही. कारण, त्यांना स्वतःची जबाबदारी कळत नाही. अशी प्रतिक्रियाही चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. ते ‘TV9 मराठी’ सोबत बोलत होते.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!