मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील मध्यावधीत निवडणूक लागण्याचे संकेत दिले आहेत. राज्यातील शिंदे सरकार जास्त काळ टिकू शकणार नाही. सरकार पाच ते सहा महिने टिकेल, त्यामुळे मध्यवर्ती निवडणुकीसाठी तयार राहा. आता विरोधी बाकावर बसणार असलो, तरी मतदार संघात जास्तीत जास्त वेळ द्या. शिंदे सरकारमध्ये नाराजांची फौज मोठी आहे. मंत्रिमंडळ विस्तारानंतर ही नाराजी उघड होताना स्पष्ट होईल. त्यामुळे बंडखोर आमदार स्वगृही परतण्याची शक्यता आहे. असं मोठं वक्तव्य त्यांनी केलं होत. यानंतर पवारांच्या या वक्तव्यावर चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
चंद्रकांत पाटील म्हणाले की, कार्यकर्त्याचं मनोबल वाढवण्यासाठी असं म्हणावं लागतं. तसेच काल एकनाथ शिंदे यांनी म्हटल्याप्रमाणे पवारसाहेब जे म्हणतात, त्याच्या उलटं त्यांना म्हणायचं असतं, असं ते म्हणाले. तसेच पुढे ते म्हणाले कि, बंडखोर हा शब्दच चुकीचा आहे. हे सरकार भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना युतीच आहे. भाजपामध्ये कुठलीही नाराजी नाही. हिंदुत्वाच रक्षण करणारं आणि विकास कामांना चालना देणारं हे सरकार आहे, असंही ते म्हणाले.
दरम्यान, काल उद्धव ठाकरे यांनी राज्यातील सर्व शिवसेना जिल्हा प्रमुखांची बैठक घेतली. हिंमत असेल तर मध्यावधी निवडणूक घेऊन दाखवा, असं आव्हानही उद्धव ठाकरे यांनी दिलं आहे. यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देखील राज्यात विधानसभेसाठी मध्यवधी निवडणुका लागतील असं म्हटलंय. तर यानंतर पुढे सध्याची एकूणच राजकीय परिस्थिती पाहता मध्यावधी निवडणुका लागणार आहेत, असा दावा आदित्य ठाकरे यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

