Share

Eknath Shinde : ‘रिक्षाच्या स्पीडपुढे मर्सिडीजचा स्पीड फिका पडला’; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका

Published On: 

मुंबई : काल अधिवेशन संपल्यानंतर विधान भवनातून बाहेर पडताना मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचा भव्य हार घालून सत्कार करण्यात आलाय. यावेळी त्यांच्या स्वागताला कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. याचदरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बोलत असताना अचानक त्यांच्या हातातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या समोरचा माईक काढून घेतला. यावरूनच उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना जोरदार टोला लगावला होता.

काल रिक्षावाल्याची रिक्षा सुसाट सुटली होती. त्याला ब्रेक नव्हता. सुसाट सुटली होती. सगळ्यांच्या चेहऱ्यावर टेन्शन होते, की अपघात तर होणार नाही ना… काल उपमुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांसमोर असलेला माईक आपल्याकडे खेचला, पुढे काय काय खेचतील ते माहीत नाही, असा टोला उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना लगावला होता. आता उद्धव ठाकरे यांच्या या टीकेनंतर एकनाथ शिंदे यांनी याला जोरदार प्रत्युत्तर दिल आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे आणि शिवसेना नेत्यांचा खरपूस समाचार घेतला आहे. ‘रिक्षाच्या स्पीडपुढे मर्सिडीजचा स्पीड फिका पडला.. कारण हे सर्वसामान्यांचं सरकार’, असं ट्विट करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. तसेच काल एकनाथ शिंदे सरकारने विधानसभेत विश्वासदर्शक ठराव बहुमताने जिंकला. एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणामध्ये अनेक किस्से सांगितले. तसेच भाषणादरम्यान, तुफान फटकेबाजी देखील केली.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!