मुंबई : सध्या पावसाळा सुरु झाला आहे. राज्यात जोरदार पावसाचं आगमन झालं आहे. यानंतर हवामान खात्याने पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. हे लक्षात घेता सध्या देखील पावसाचा जोर वाढल्याने पूर परिस्थिती निर्माण होऊन जीवित व मालमत्तेची हानी होऊ नये म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे. यासाठी मुख्यमंत्र्यांनी मुंबईमध्ये जाऊन स्वत: परिस्थितीची पाहणी केली आहे.
सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बहुमत सिद्ध केलं. लगेचच दुसऱ्या दिवशी सत्तेची धुरा हाती घेत वाढत्या पावसाच्या जोरामुळे मुंबई मनपा ने केलेल्या उपाययोजनांचा आढावा त्यांनी घेतला.
यावेळी त्यांनी मुंबई मनपाच्या नियोजनाचं कौतुक केलं आहे. “पावसाचा जोर वाढला तरी मुंबई थांबलेली नाही” असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई मनपावर स्तुतीसुमनं उधळली आहेत. मुंबईमध्ये अशी २५ ठिकाणं आहेत. जिथे थोडा जरी पाऊस झाला तरी रेल्वे वाहतूक ठप्प होते. त्यामुळे नागरिकांना जास्तीचे पैसे देऊन घरी जावं लागतं.
त्याबरोबरच पावसामुळे झालेल्या परिस्थितीचा गैरफायदा घेऊन रिक्षा चालक आणि टॅक्सीधारक देखील नागरिकांकडून जास्तीचे पैसे घेतात. त्यामुळे अशा ठिकाणी महापालिकेच्या बेस्ट बसची सोय करणे महत्त्वाचं आहे. यामुळे नागरिकांची गैरसोय होणार नाही आणि त्यांना अधिकचे पैसे खर्च करावे लागणार नाहीत. एवढेच नाही तर ज्या ठिकाणी अशी परिस्थिती निर्माण झाली असेल त्या ठिकाणी नागरिकांसाठी चहा पाणी नाश्त्याची सोय करण्याच्या देखील सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

