सांगली : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि भाजप प्रदेशाध्यक्ष व आमदार चंद्रकांत पाटील यांच्यात अनेकदा शाब्दिक वाद होत असल्याचे दिसून येते. चंद्रकांत पाटलांची कोथरूड मतदारसंघातील आमदारकीची उमेदवारी टीकेचे कारण होत असल्याचे बऱ्याचदा दिसून आले. काल, शरद पवारांनी पाटलांवर टीका करताना पुन्हा एकदा याच मुद्द्यावर हात घातला.
शरद पवार यांना काल माध्यमांनी चंद्रकांत पाटील यांनी पूजा चव्हाण प्रकरणी महाविकास आघाडीवर केलेल्या टीकेसंदर्भातील प्रश्न केला असता, ‘ज्यांना गाव सोडून लढावे लागते, त्यांना काय उत्तर द्यायचे,’ असा टोला लगावला होता. यावर चंद्रकांत पाटील यांनी सांगलीतील पत्रकार परिषदेत उत्तर दिलं आहे.
‘मी काल शरद पवार यांच्याकडून पुजा चव्हाण प्रकरणात न्यायाची अपेक्षा व्यक्त केली. त्यांनी त्यावर असे उत्तर देणे अपेक्षित नव्हते. मी कोथरूडला गेलो, ठीक ! पण, तेही माढ्याला गेले. एकदा घोषणा करून मागे फिरले. त्याचे उत्तर त्यांनी द्यावे. ते मुंबईत राहतात. त्यांचे मतदार यादीतील नाव मुंबईत आहे. बाहेर जावून राहणे यात चूक आहे, पक्ष हितासाठी ते करावे लागते’ असं प्रत्युत्तर चंद्रकांत पाटील यांनी दिलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- महाविद्यालयीन निवडणुका ; नेतृत्वोदय, संघटना व राजकारण
- ‘…म्हणूनच “जेल पर्यटन” चालू केले असावे! जनता मंत्र्यांना अजुन कुठे भेटणार ?’
- ‘कोरोनामुळे अनेकांनी जवळची लोकं गमावली, त्यामुळे शिवजयंती…’
- पँगाँगमधून सैन्य माघारी, हे केंद्र सरकारने चीनसमोर घातलेलं लोटांगण; काँग्रेसची जहरी टीका
- ‘रोहिणी खडसे यांचे जे नुकसान मागच्या निवडणुकीत आम्ही केलं, ते आगामी विधानसभा निवडणुकीत व्याजासकट भरुन काढू’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

