🕒 1 min read
कोल्हापूर : भाजप आमदारांचे निलंबन घटनाबाह्य असल्याने सुप्रीम कोर्टाने ते रद्द केले आहे. कोर्टाच्या निर्णयानंतर शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आणि परिवहन मंत्री अनिल परब (Anil parab) यांनी न्यायालयाच्या विरोधात वक्तव्य केले आहे. त्यामुळे त्यांच्यावर न्यायालयाचा अवमान केल्याची याचिका दाखल करणार असल्याचे भाजप प्रदेधाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. ते कोल्हापूर जिल्ह्यातील खानापूर येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना बोलत होते.
पुढे चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘गतवर्षी जुलै महिन्यात तालिका अध्यक्षांशी गैरवर्तन केल्याचा ठपका ठेवत भाजपच्या १२ आमदारांचे एक वर्षासाठी निलंबन केले होते. सर्वोच्च न्यायालयाने आता त्यांना न्याय दिला आहे. आमदार म्हणून कर्तव्य बजावण्याचा अधिकार त्यांना बहाल केला आहे. मात्र शिवसेना खासदार संजय राऊत व परिवहन मंत्री अनिल परब सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाविरोधात वक्तव्य करून न्यायालयाचा अवमान करीत आहेत. सर्वोच्च न्यायालयाकडे संपूर्ण देश आदराने पाहत असताना ते चुकीचे वक्तव्य करीत असून न्यायालयाचा अवमान केल्याच्या कारणावरून त्यांच्या विरोधात अवमान याचिका दाखल केली जाईल.’
चंद्रकांत पाटलांनी वाईन विक्रीच्या निर्णयावरही टीका केली आहे. चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘तरुण पिढी बरबाद करणारा हा शासनाचा निर्णय असून राज्य सरकार लोकांची दिशाभूल करीत आहे. यामागचे गुपित लवकरच उघड होईल. भविष्यात रेशनधान्य दुकानातसुद्धा दारू विक्री करायचा शासन निर्णय घेऊन जनतेला देशोधडीला लावेल, असेही चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
-
“२०१४ साली ज्यांनी युती तोडली त्या भाजपच्या नेत्यांना पूनम महाजन आता नामर्द म्हणणार का?”
-
गानसम्राज्ञी लता मंगेशकर कोरोनामुक्त; कोविड न्यूमोनियाचे झाले होते निदान
-
“मुख्य सचिवानेच पक्षाच्या प्रतिष्ठेची लक्तरे उडविली, मुख्यमंत्री उत्तर देणार काय?” बावनकुळेंचा सवाल
-
“आता रं…लोचा झाला की”, वाईनविक्री निर्णयावरील विरोधकांच्या टीकेला रुपाली पाटलांचे प्रत्युत्तर
-
“नॉटी नामर्द, बिगडे नवाब, नन्हें पटोले…”, अमृता फडणवीसांची खोचक टीका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
