कोल्हापूर : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी संभाजीराजेंनी आंदोलनाची भूमिका घेतली आहे. कोरोनाची परिस्थिती असल्यामुळे ते संयम राखून आहेत. मात्र, चंद्रकांत पाटील यांच्याकडून आंदोलकांना उकसवण्याचे काम सुरू आहे, अशी टीका ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली. कोरोना आढावा बैठकीसाठी मुश्रीफ गडहिंग्लजला आले होते. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी चंद्रकांत पाटील यांच्या भूमिकेचा समाचार घेतला.
ते म्हणाले, चंद्रकांत पाटील यांना नेमके काय झाले आहे हे माहित नाही. सत्ता गेल्यामुळे ते अस्वस्थ झाले आहेत. मराठा आरक्षणाच्या आंदोलनासंदर्भात संभाजीराजेंनी घेतलेली भूमिका योग्य आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत लोकांना काय त्रास झाला याची कल्पना त्यांना आहे. त्यामुळे संभाजीराजे संयम आणि शांततेची भूमिका घेत आहेत. सध्या अशाच सयंमी नेतृत्वाची गरज आहे. पण पाटील लोकांना मोर्चा, आंदोलन करण्यासाठी उकसवण्याचे काम करीत आहेत.
‘मराठा आरक्षणाचा पेच घटनात्मक आहे. पण नोकरी आणि शिक्षणातील आरक्षणासह अन्य मागण्यांबाबत मराठा समाजाला दिलासा देण्याचा शासनाचा प्रामाणिक प्रयत्न आहे. त्यासाठी महाविकास आघाडीचे सरकार गरज लागेल ती किंमत मोजण्यास तयार आहे असे मुश्रीफ म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- ‘चला, राऊतांनी हे मान्य तर केलं की त्यांचा वाघ पिंजऱ्यात आहे!’, चंद्रकांत पाटलांचा पलटवार
- ‘केंद्रात काहीही होवो, युपीत भाजपचे सरकार जाणार हे निश्चित’, राष्ट्रवादीचा दावा
- ‘बाळासाहेब असते तर विमानतळाला नाव नाकारले असते!’, भुजबळांचा शिवसेनेला सल्ला
- आरक्षणावर नक्षल्यांची भूमिका जाहीर, ‘मराठा समाजातील दलाल नेत्यांपासून सावध राहा!’
- वाघाच्या वादात भुजबळांची उडी, भाजपला म्हणाले, ‘वाघ पंजाही मारू शकतो!’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
