जळगावः महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून आरोप प्रत्यारोपाचा सामना रंगला आहे. महाविकास आघाडी विरुद्ध भाजपची नेते मंडळी एकमेकांवर शाब्दिक हल्ला करत आहेत. यातच आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही महाविकास आघाडी सरकारवर आणि एकनाथ खडसेंवर निशाणा साधला आहे. काल एकनाथ खडसे यांनी व्हिडिओद्वारे भाजपवर काही आरोप केले होते. आज पाटील हे गिरीश महाजन यांच्या मुलीच्या लग्नासाठी जळगावमध्ये उपस्थित आहेत. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधत खडसेंच्या आरोपांना प्रतिउत्तर दिले आहे.
पाटील म्हणाले की, “आमच्यामुळे जनतेचे मनोरंजन होत नाही. भ्रष्टाचाराच्या अनेक प्रकरणांमध्ये महाविकास आघाडी सरकारचे मंत्री अडकले आहेत, अडकत आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या कृत्यामुळेच जनतेची झोप उडाली आहे. खडसे हे भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले असले, तरी आजही आमच्या मनात त्यांच्याबद्दल आदर आहे.” यावेळी त्यांनी खडसेंना काही सल्ले देखील दिले. “भाजपमध्ये असताना जे काही मिळत होतं, खडसेंनी ते समाधान मानून पदरात पाडून घ्यायला होतं. पक्षाचे नुकसान न करता पुढे जायला हवं होतं. परंतु त्यांनी तसे केले नाही. आणि आता ते जरी आमच्यावर आरोप – प्रत्यारोप, टीका करत असतील, तर त्यांनी पथ्ये पाळली पाहिजेत. बाकी ते जेष्ठ नेते आहेत. योग्य काय ते ठरवतील, असा खोचक टोला देखील त्यांनी लगावला.
महतवाच्या बातम्या:
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

