Share

“शिवसेनेचं हिंदुत्व ढोंगीपणाचं आहे” – श्वेता महाले आक्रमक

Published On: 

बुलडाणा:  भाजपच्या आमदार श्वेता महाले यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे. म्हणाल्या, “शिवसेनेचं हिंदुत्व फक्त आणि फक्त अंगावर चढवण्यापूरते राहिलं आहे. ज्या दिवशी शिवसेना कॉंग्रेस बरोबर सत्तेत बसली, त्याच दिवशी त्यांनी हिदुत्वाला लाथ मारली”, असं वादग्रस्त विधान श्वेता महाले यांनी केले आहे.

तसेच म्हणाल्या, “हिंदुत्वाचा विषय घेऊन बाळासाहेब लढले मोठे झाले. त्याच हिंदुत्वाला आजची शिवसेना विसरली आहे. त्यामुळेच काँग्रेससोबत जाणारी शिवसेना उद्या जर एमआयएमसोबत गेली तर आश्चर्य वाटायला नको. ज्या नवाब मलिकांनी मुंबईत बॉम्बस्फोट घडवले. शिवसेना भवनात बॉम्बस्फोट घडवले. त्यांनाच वाचवण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पुढे आले आहेत. हे दुर्देवी आहे. शिवसेनेचं हिंदुत्व निघून गेलं आहे. सध्या शिवसेनेचं हिंदुत्व ढोंगीपणाचं आहे”. असे बोलत निशाणा साधत थेट टीका श्वेता महाले यांनी केली आहे.

श्वेता महाले यांनी शिवसेनेवर हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून टीका केली आहे. सत्तेसाठी शिवसेनेने हिंदुत्वाला तिलांजली दिल्याची टीका भाजपकडून शिवसेनेवर करण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!