Share

अमृता फडणवीस यांच्याही सुरक्षेत कपात; वाय दर्जा ऐवजी मिळणार ‘ही’ सुरक्षा

Published On: 

मुंबई : माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षेत मोठी कपात करण्यात आली आहे. राज्य सरकारने नुकताच हा निर्णय घेतला आहे. फडणवीसांच्या सुरक्षा ताफ्यात देण्यात आलेली बुलेटप्रुफ गाडीसुद्धा काढून घेण्यात येणार आहे. दोन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत ठाकरे सरकारने हा निर्णय घेतला आहे. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांच्या सुरक्षेत कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.

विशेष म्हणजे मुंबई पोलिसांनी फडणवीस यांच्या जिवाला धोका असल्याचा अहवाल यापूर्वीच दिला होता. त्यानंतरसुद्धा त्यांच्या सुरक्षेत कपात करण्यात आली आहे. देवेंद्र फडणवीसांसह त्यांच्या पत्नी व मुलीची देखील सुरक्षा कमी कारणात आल्याचे वृत्त ‘मटा’ने दिलं आहे.

फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस आणि मुलगी दिवीजा फडणवीस यांच्या सुरक्षेत कपात करण्यात आली आहे. याआधी अमृता फडणवीस यांना वाय दर्जाची सुरक्षा पुरवण्यात आली होती. मात्र, आता त्यांना नवीन आदेशानुसार एक्स दर्जाची सुरक्षा देण्यात येणार आहे.

दरम्यान, ‘सुरक्षा द्यायची की नाही यासाठी एक पद्धत असते. आमच्या सरकारच्या काळात देखील आम्ही तीच पद्धत अवलंबत होतो. परंतु, या सरकारच्या काळात ज्यांना कोणताही धोका नाही त्यांना मोठ्या प्रमाणात सुरक्षा दिली जातेय, असं पाहायला मिळतंय. पण माझी यावर कोणतीही तक्रार नाही. सुरक्षा कमी केली म्हणून मी फिरणं थांबवणार नाही. त्यामुळे या निर्णयाचा माझ्यावर काहीही परिणाम होणार नाही’ असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!