मुंबई : राज्यात गेले काही दिवस विश्रांती घेतेलेल्या पाऊस पुन्हा एकदा सक्रीय झाला आहे. महाराष्ट्रातील उत्तर कोकण, उत्तर मध्य भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आला आहे. आज काही ठिकाणी अतिमुसळधारेचा इशारा देण्यात आला आहे.
मध्य महाराष्ट्रात 31 आॅगस्ट रोजी काही ठिकाणी अतिमुसळधारेचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे पुढील काही दिवस महाराष्ट्रातील काही भागात मुसळधार पाऊस येण्याची शक्यता आहे. पुढील दोन दिवस ठाणे आणि रायगडला उद्यासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
३० ऑगस्ट,कमी दाबाचे क्षेत्र छत्तीससगड वर असून,१५° उत्तर वर पूर्व-पश्र्चिम शियर जोन आहे. ह्यांचा प्रभाव म्हणून,महाराष्ट्र राज्यासाठी IMD ने खालील प्रमाणे इशारे पुढच्या ३,४दिवसासाठी दिलेले आहेत.काही ठिकाणी मुसळधार ते अतीमुसळधार पावसाची शक्यता.मुंबई ठाणे,उत्तर कोकणात पण @RMC_Mumbai pic.twitter.com/e8tHRpwd6K
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) August 30, 2021
मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगडमध्ये काही ठिकाणी अतिमुसळधार ते मुसळधार पाऊस येऊ शकतो. तर लातूर आणि उस्मानाबादसाठी आॅरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. उद्या नाशिकसाठी आॅरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. संपूर्ण विदर्भासाठी आज आॅरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर काही भागात कमी स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- मोठी बातमी! शिवसेना खासदार भावना गवळी यांच्या ५ संस्थावर ईडीची धाड
- ‘मोदी-शहांकडून देशाची विक्री; अंबानी, अदानींकडून खरेदी’, बाळासाहेब थोरातांचा घणाघात
- ‘गेल्या चार-पाच वर्षांपासून आमच्या नेत्यांना बदनाम करण्याचे कारस्थान सुरू’, राष्ट्रवादीचा आरोप
- ‘बिरोबाच्या खोट्या शपथा घेतल्या तर त्याचं पार वाटोळं होतं’, जयंत पाटलांचा पडळकरांना टोला
- ‘योग्य वेळी सीडी लावणार, सध्या ती पोलिसांकडे’, खडसेंचा इशारा


