दिल्ली : बुधवारी आयपीएलमध्ये दिल्ली येथे चेन्नई सुपर किंग्स आणि सनारायझर्स हैदराबाद संघात लढत आहे. दिल्ली येथे होणारा हा यंदाच्या स्पर्धेतील पहिलाच सामना आहे. एकीकडे हैदराबाद संघाने केवळ एका सामन्यात विजय मिळवला तर दुसरीकडे चेन्नईने केवळ एका सामन्यात पराभव स्विकारला आहे.
सलामीच्या सामन्यात दिल्ली कॅपीटल्स संघाकडून पराभव स्विकारल्यानंतर महेंद्रसिंह धोनीचा चेन्नई सुपर किंग्सने सलग चार सामन्यात विजय मिळवला आहे. मागील सामन्यात स्पर्धेतील अजिंक्य असलेल्या आरसीबीच्या संघाला सीएसकेने एकतर्फी नमवले. मागील सामन्यात रविंद्र जडेजाने अष्टपैलु कामगीरी करत विरोधी संघाची झोप उडवली आहे. तर आजच्या सामन्यात हैदराबादचा संघ सीएसकेचा आणि खास करुन जडेजाचा सामना कसा करते हे पाहणे महत्वाचे राहणार आहे.
तर दुसरीकडे डेव्हिड वॉर्नरच्या सनरायझर्स हैदराबाद संघाची स्पर्धेतील कामगिरी अत्यंत निराशाजनक राहिली आहे. स्पर्धेतील आतापर्यंतच्या झालेल्या पाच सामन्यापैकी केवळ एका सामन्यात हैदराबादने विजय संपादन केला आहे. हैदराबाद संघातील फलंदाज हे सतत अपयशी ठरत आहे. केन विल्यमसनच्या पुनरागमनामुळे काहीसा आधार मिळाला आहे. मात्र इतर फलंदाज सपशेल अपयशी ठरत असल्याने हैदराबादचा संघ फलंदाजीत संघर्ष करताना दिसत आहे. आजच्या सामन्यात हैदराबादची ऑरेंज आर्मी सीएसकेआर्मीचा पाडाव करुन पुन्हा विजयाच्या मार्गावर परतते का सीएसकेची विजयाची घोडदौड अशीच सुरु राहते याची आयपीएल रसिकांना उत्सुकता लागली आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘चव्हाणसाहेब, महाराष्ट्र निष्क्रिय सरकार आणि तक्रारखोर नेतृत्वाची किंमत मोजतोय त्यावर आधी बोला’
- जिंतूरात व्यापाऱ्याची पोलिसांवर दादागिरी करत अर्वाच्य भाषेत शिवीगाळ
- पुणे : मोक्कानुसार कारवाई केलेल्या दीप्ती काळेचा ससूनच्या ८ व्या मजल्यावरुन पडून मृत्यू
- आरसीबी विरुद्धच्या सामन्यात रिषभचे यष्टीमागुन समालोचन; सामना समालोचक हसुन लोटपोट
- १९९४ स्फोटक प्रकरणातील आरोपी २६ वर्षानंतर जेरबंद
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

