अहमदाबाद : आयपीएलमध्ये मंगळवारी झालेल्या सामन्यात बेंगळुरु रॉयल्स चॅलेंजर्स संघाने दिल्ली कॅपीटल्स संघाचा अवघ्या एका धावेने पराभव केला. आरसीबीने दिलेल्या १७२ धावांचा पाठलाग करताना दिल्लीच्या फलंदाजानी १७० धावांपर्यंत मजल मारली. आखेरच्या चेंडुवर षटकाराची गरज असताना रिषभ पंतने चौकार मारल्याने एका धावेने आरसीबीचा विजय झाला. या विजयानंतर आरसीबी संघ हा पुन्ह गुणतालीकेत पहिल्या स्थानी विराजमान झाला आहे. धडाकेबाज खेळीसाठी आरसीबीचा फलंदाज एबी डिव्हीलियर्सला सामनावीराच्या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.
या सामन्यात आरसीबीची फलंदाजी सुरु होती तेव्हा दिल्ली कॅपीटल्सचा कर्णधार रिषभ पंतचे यष्टिमागुन समालोचन सुरु होते. या सामन्यात आरसीबीचा संघ फलंदाजी करत असताना सातवे षटक टाकायला अमित मिश्रा आला होता. या षटकातील पाचव्या चेंडुवर फलंदाजी करत असलेला ग्लेन मॅक्सवेलने षटकार मारला. हा षटकार पाहताच रिषभ पंतने म्हणाला की, ‘हा तर खूपच जलद आहे यार.’. रिषभ पंतचे हे यष्टीमागचे समालोचन ऐकून समालोचक देखील हसायला लागले होते.
https://twitter.com/CricketUnlimi/status/1387059422740946951
रिषभ पंतचा व्हिडीओ सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल होता आहे. रिषभ पंतने याआझी इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध झालेल्या मालिकांमध्ये यष्टीमागे केलेल्या समलोचनामुळे भरपूर चर्चेत होता. एबी डिविलियर्सने सामन्यात प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या बेंगलोर संघाकडून तुफानी अर्धशतकी खेळी केली होती. तसेच ग्लेन मॅक्सवेलने देखील २५ धावांचे महत्वपूर्ण योगदान दिले होते.
महत्वाच्या बातम्या
- ठाकरे सरकारच ठरलं ! अखेर राज्यात १८ ते ४४ वयोगटासाठी सरसकट मोफत लसीकरण
- रश्मी शुक्लांनी CBI चौकशीत दोन ‘अनिल’ आणि बड्या नेत्याचं नाव घेतलं; भाजप नेत्याचा दावा
- ‘गोकुळ’साठी राजू शेट्टींच ठरलं; निवडणुकीत ‘या’ गटाला जाहीर केला पाठींबा
- ‘एक कोटी देतो, रेमडेसिविर द्या…रुग्णांचे जीव तरी वाचतील’; शिवसेना आमदाराचा संताप
- ऑक्सीजन तुटवड्याला केंद्र सरकारचा फाजील आत्मविश्वास कारणीभूत : पृथ्वीराज चव्हाण


