औरंगाबाद : पोलिसांना २६ वर्ष गुंगारा देणारा आरोपी अखेर मंगळवारी उशिरा पोलिसांच्या हाती लागला आहे. प्रवीण विजयकुमार बोरसे ( वय ४९, रा. साईनाथ नगर बीडबाय पास) असे आरोपीचे नाव आहे. जवाहरनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत त्याच्यावर स्फोटक कायदा अंतर्गत गुन्हा दाखल आहे.
गुन्हे शाखेचे पथक फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी शहरात गस्त घालत असताना. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश आघाव यांना खबऱ्या कडून माहिती मिळाली की, जवाहर नगर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या १९९४ स्फोटक प्रकरणातील आरोपी हा बीडबाय पास येथे आलेला आहे.
या माहितीची खात्री पोनि आघाव यांनी केली. त्याचा शोध घेण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक पवन इंगळे आणि त्यांच्या पथकाला बीडबाय पास येथे पाठविण्यात आले. त्याचा शोध घेत असताना, तो साईनाथ नगर येथे असल्याचे कळताच पोलिसांनी साईनाथ नगरकडे मोर्चा वळवत आरोपी प्रवीण बोरसेला ताब्यात घेतले.
विशेष म्हणजे त्याच्या विरुद्ध न्यायालयाने समन्स, अजामीन पात्र वॉरंट काढले होते, तसेच स्फोटक खटला डॉरमंट स्थितीवर वर ठेऊन त्याला फरार घोषित केले होते. हि कामगिरी पोलीस निरीक्षक अविनाश आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पवन इंगळे आणि त्यांच्या पथकाने केली.
महत्वाच्या बातम्या
- मोठी बातमी! ‘या’ दिग्गज क्रिकेटपटूला आयसीसीने केले निलंबीत
- ‘स्मशानभूमीत अंत्यसंस्काराच्या रांगा मोदी सरकारला आयुष्यभर छळतील’
- ढगाळ वातावरण, तरीही पारा ४२ अंशावर
- ‘एकनाथ गायकवाड यांच्या निधनामुळे एक निष्ठावान व लोकप्रिय नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले!’
- ‘या घटना आणि फोटो मोदी सरकारचा आयुष्यभर पिच्छा पुरवतील’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
