Share

‘चव्हाणसाहेब, महाराष्ट्र निष्क्रिय सरकार आणि तक्रारखोर नेतृत्वाची किंमत मोजतोय त्यावर आधी बोला’

Published On: 

मुंबई : महाराष्ट्रासह देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर माजवला आहे. यामुळे आरोग्य सेवेवर प्रचंड ताण निर्माण होत असून रुग्णालयात बेड्स, ऑक्सिजन, रेमडेसीवीर, डॉक्टरांची कमतरता व इतर औषधांचा तुटवडा निर्माण झाल्याने रुग्णांच्या नातेवाईकांना मनस्ताप सहन करावा लागला असून व्यवस्थेविरोधात नागरिकांमध्ये चीड निर्माण होत आहे.

या पार्श्वभूमीवर राज्याचे माजी मुख्यमंत्री व काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. देशात ऑक्सिजनच्या कमतरतेमुळं जी गंभीर परिस्थिती निर्माण झालीये त्यास केंद्र सरकारचं जबाबदार आहे, असा आरोप त्यांनी केला आहे. केंद्र सरकारचा फाजील आत्मविश्वास ऑक्सिजन तुटवड्याला कारणीभूत असल्याचा आरोप कॉंग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केलाय. देशात ऑक्सीजनच्या कमतरतेमुळे जी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे त्यास पूर्णपणे केंद्र सरकारच जबाबदार असल्याचे चव्हाण म्हणाले आहेत.

दरम्यान, पृथ्वीराज चव्हाण यांच्या आरोपांना भाजपने देखील चोख प्रत्युत्तर दिलं आहे. ‘चव्हाणसाहेब, आपण महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारच्या निष्क्रीय आणि तक्रारखोर नेतृत्वाची किंमत मोजत आहोत, त्याबद्दल आधी बोला. कोरोनाची दुसरी लाट सुनामीसारखी येईल असे स्वतःच नोव्हेंबर महिन्यात सांगून पाच महिने काहीही तयारी न करणाऱ्या तुमच्या मुख्यमंत्र्यांबद्दल आधी बोला.’ असं आव्हान महाराष्ट्र भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी दिलं आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!