Share

नांदेड मनपासमोर बोगस डॉक्टर शोधण्याचे आव्हान ! नागरिकांच्या जिवाशी खेळ सुरू

Published On: 

🕒 1 min read

नांदेड : नांदेड – वाघाळा महानगरपालिका क्षेत्रात बोगस डॉक्टर मोठया प्रमाणावर कार्यरत असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. अनेक वर्षापासून महापालिकेकडून एकही बोगस डॉक्टरांवर कारवाई केली नाही. परंतु पीरबुऱ्हाण भागात बोगस डॉक्टराच्या माहिती काढण्यासाठी गेलेल्या पत्रकाराला बेदम मारहाण केल्याने शहरामध्ये खळबळ उडाली आहे.

वैद्यकीय व्यवसाय करण्यासाठी आवश्यक ते ज्ञान व पदव्या नसतानाही बोगस डॉक्टर नांदेड शहरासह तालुक्यात सक्रीय झाले आहेत. या बोगस डॉक्टरकडे असलेली कागदपत्रे मूळ आणि सत्य आहेत का नाहीत याची पडताळणी मनपाच्या आरोग्य विभागाने करणे गरजेचे आहे. परंतु या विभागाला या कामासाठी वेळ मिळत नसल्याचे दिसून येते. शहरात अनेक दाटीवाटीच्या वस्तींसह झोपडपट्टीमध्ये जिथे आरोग्य सेवा पोहोचतच नाहीl, त्या ठिकाणी हे बोगस डॉक्टर ठाण मांडून बसलेले आपल्याला आढळतात. या भागात शासनाच्या आरोग्य सेवा पोहोचत नसल्यामुळे या भागात असलेल्या खाजगी डॉक्टरकडे आरोग्याची तपासणी करतात. असे अनेक बोगस डॉक्टर आजही सक्रिय असल्याचे पहावयास मिळत आहे.

बोगस डॉक्टर शोधण्याचे आव्हान

शहर व तालुक्यातील ग्रामीण भागात  वर्षभरापासून आजतागायत बोगस डॉक्टरांनी उच्छाद मांडला आहे. नांदेड जिल्ह्यात डॉक्टरांनी बिनधास्तपणे व्यवसाय सुरू असल्यामुळे ते रुग्णांच्या जिवाशी खेळत आहेत. याकडे प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत. नांदेड शहरासह व तालुक्यात ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ अशाच प्रकारचा रुग्णांच्या आरोग्याचा खेळ सुरु आहे. पर राज्यातून व इतर जिल्ह्यातून काही तरुण मंडळी शहरासह ग्रामीण भागातून येत आपला वैद्यकीय व्यवसाय थाटून रुग्णांच्या जिवाशी खेळत आहेत. सद्यस्थितीत कोरोनाचा वाढता कहर लक्षात घेता अशा बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी मनपा यंत्रणेस आदेश द्यावेत अशी मागणी नांदेड शहरासह जिल्हाभरातील नागिरांकडून होत आहे.

महत्त्वाच्या बातम्या        

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!