🕒 1 min read
औरंगाबाद : जून ते ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या नुकसानीची भरपाई म्हणून शासनाने शेतकऱ्यांना अनुदान मंजूर केले होते. मंजूर झालेले अनुदान बँकेच्या खात्यात वर्ग करण्यात आले असतांना गेल्या दोन महिन्यापासून बालानगर खादगाव येथील शेकडो शेतकरी मात्र अतिवृष्टीच्या अनुदानापासून वंचित आहेत.
शेतकऱ्यांना अनुदानापासून वंचित ठेवणाऱ्या बँक अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी किशोर तांगडे यांच्यासह २५ शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे सहकार आयुक्त पुणे यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे. शासनाने जून ते ऑक्टोबर २०२० या कालावधीत विविध जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे बाधित शेतकऱ्यांना मदतीसाठी पहिल्या टप्प्यात अतिवृष्टीसाठी अनुदान मंजूर केले होते.
पैठण तालुक्यातील बालानगर, खादगाव येथील ५७८ शेतकऱ्यांची यादी तयार करण्यात आली होती. अनुदान मंजूर केलेल्या यादीतील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा ४१ लाख ८२ हजार ६५० चा धनादेश जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक बालानगर शाखा यांना नोव्हेंबर २०२० मध्ये देण्यात आला होता. धनादेश जमा करून तब्ब्ल दोन महिने होऊन सुद्धा शेतकऱ्याच्या खात्यात शासनाने मंजूर केलेले अतिवृष्टी अनुदान अजून पर्यंत मिळालेले नाही. अनुदानासाठी शेतकरी बँकेत चकरा मारताना दिसत आहेत.
महत्वाच्या बातम्या
- माहूरमधील रेणुकादेवी मंदिरात महिला पुजाऱ्यांना स्थान द्या, तृप्ती देसाईंची मागणी
- अयोध्येत बांधल्या जाणाऱ्या मशिदीत नमाज अदा करणे हे हराम आहे : ओवेसी
- ‘…तर असा बदनामीकारक मजकूर आपण कधीच ट्विटमध्ये वापरला नसता’
- ऑस्ट्रेलियाच्या बॉलरचा सामना करणं सगळ्यात कठीण नव्हतं, मात्र…
- ‘या’ जागेसाठी विधानसभा निवडणुकीत झाली फिक्सिंग, भाजप नेत्याचा गौप्यस्फोट


